जे काही केलंय ते पवार साहेबांच्या परवानगीनेच केलंय : अजित पवार स्पष्टोक्ती

0

पुणे : आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, जो निर्णय घेतला तो पवार साहेबांना विचारुन आणि संमतीनेच, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात ते बोलत होते.तसंच सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो, असा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, मला राजकीय भूमिका घ्यावी लागली ती साहेबांना विचारून घेतली. ते सुरुवातीला हो म्हणाले परत म्हणाले की ही, भूमिका मला घेता येणार नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे पुढे गेलो. पण हे सगळे होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. मात्र आता काय झाले दोन पक्ष झाले आहेत.सध्या दोन्ही बाजूंची पवार मंडळी सगळ्यांना येऊन भेटायला लागली, सगळ्यांची विचारपूस करायले लागले… कधी न दिसणारे परंतु आता साड्या द्यायला लागले, स्टीलची घमेले द्यायला लागले, स्टीलचे डबे द्यायला लागले.. ते म्हणतात ना पुरुष मंडळी आहेत तोपर्यंत घर एक असते, पण एकदा का काही… सध्या नवरात्र आहे. स्त्रीशक्तीचा आदर केला पाहिजे, असे अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागतात : अजित पवारआगामी निवडणुकीच्या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले . मी मधल्या काळात पक्क ठरवलं होतं की बास झाले आता… पण कधी ना कधी थांबावं लागते, पण लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागतात.

आजपर्यंतचा तुम्हाला अनुभव त्यासंदर्भात मी पुन्हा विचार करायला लागलो आहे.गोळ्या देतांना काटकसर करा, अजित पवारांची डॉक्टरांना कोपरखळी1967 पासून आजपर्यंत काही मिळाले नाही आता मिळतंय ते घ्या म्हणावं. इतक्या वर्ष मत देत आलेलो आहे त्यामुळे मिळतय ते घ्या, असे तुमचे पेशंटला सांगा असे देखील अजित पवार म्हणाले. शाल देताना आयोजकांनी काटकसर केली, काटकसर करणं चागलं, पण आम्ही पेशंट म्हणून आल्यावर पण गोळ्या देतांना काटकसर करा, अशी कोपरखळी डॉक्टरांना अजित पवारांनी मारली.सुप्रियाच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक : अजित पवारगेल्या वेळची परिस्थिती वेगळी होती. साहेबांच्या वयाचा विचार करत लोकसभेला सुप्रिया सुळे मतदान करायचे मानसिकता बारामतीकरांची होती. शेवटी मतदाराला अधिकार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी मान्य केली. आता मागचे सर्व विसरुन पुढे जायचे, असे अजित पवार म्हणाले.पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here