कोल्हापूर : निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटातील पक्ष चिन्हाबाबत काल निर्णय दिला आहे. आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. दोन्ही गटांना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. यामुळे आता कट्टर शिवसैनिक शिंदे गटाविरोधात आणि भाजपविरोधात आक्रमक झाले असून ज्या रिक्षावाल्याला आई प्रमाणे शिवसेनेने सांभाळले आणि मुख्यमंत्री केले त्याच आईच अस्तित्व गद्दार मिठवत असल्याचे कोल्हापुरातील शिवसैनिक म्हणत आहेत. तर चिन्ह कोणते ही असो आमचे श्रद्धास्थान मातोश्री असून उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याच्याशी आम्ही सहमत आहोत असेही येथील शिवसैनिकांनी म्हटले आहे.
ज्याना शिवसेनेने आईप्रमाणे जपल, रिक्षावाल्याला मुख्यमंत्री केलं त्याच आईचं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न : एकनाथ शिंदे यांनी बंड करत 40 आमदार व खासदार घेत भाजपबरोबर येऊन सत्ता स्थापन केली. यानंतर आम्हीच खरी शिवसेना म्हणत शिवसेना चिन्हावर दावा केला. हे प्रकरण कोर्टात आणि आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले आणि निवडणूक आयोगाने काल रात्री अखेर शिवसेनेचे चिन्ह गोठवलेच आणि शिवसेना हे नाव दोन्ही गटाला वापरता येणार नाही, असे आदेश ही दिले. हा निर्णय केवळ पोट निवडणुकीपुरता असला तरी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिंदे घाटावरचा सर्वच स्तरातून शिवसैनिक टीका करत असून मॅनेज झालेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे चिन्ह गोठवले जाईल याची अपेक्षा आम्हाला होतीच, मात्र शिवसेनेचे स्थापना ही हिंदुत्वाचा विचार घेऊन आणि मराठी माणसाला मोठा करण्यासाठी झाली. तुम्ही चिन्ह गोठवलं असलं तरी आमचं रक्त गोठलं नाही उलटा आमचं रक्त आता पेटून उठला आहे. केवळ वाईट एवढाच वाटत आहे की ज्या गद्दारांना शिवसेना आईप्रमाणे अस्तित्व देऊन रिक्षावाल्याला मुख्यमंत्री केलं त्या आईचं अस्तित्व मिटवण्यासाठी आज तुम्ही भाजपला साथ दिली. का यासाठी पक्षातून तुम्ही बाहेर पडला आहात का ? असा सवाल कोल्हापुरातील शिवसैनिकांनी विचारला आहे. प्रामाणिक शिवसैनिक केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच आहे असेही कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे यांनी म्हटल आहे.
शिवसैनिक
चिन्ह जरी गेल असेल तरी आमच्याकडे आसमानी सुलतानी ताकद : चिन्ह गोठवणे नवीन प्रकार नाहीये कारण जो पक्ष चांगल्या पद्धतीने काम करतो त्यांच्यात फूट पडून त्या पक्षाला बदनाम केल जात. आता जरी चिन्ह गोठवल असल तरी आमच्याकडे उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आसमानी सुलतानी ताकद असणारी एक बाहुबली नेतृत्व आहेत, असे कोल्हापूर युवासेना प्रमुख मंजित माने म्हणाले आहेत. तसेच शिंदे गटाकडून आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता तुम्हाला देखील शिवसेना ही चिन्ह वापरता येणार नाही. भाजपवाल्यांच्या नादाला लागून आज शिवसेनेच चिन्ह तुम्ही घालवलं आहे. उद्या तुमची कपडे पण काढून घेतील त्यामुळे आत्ताच स्वत:ला सांभाळा तुम्हाला खरे शिवसैनिक कधीच माफ करणार नाही. या घडीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर ह्या गद्दारांना सुरत मध्ये नाहीतर वाळवंटात सोडले असते. अशी टीका ही मंजित मानेंनी केली आहे.