बुलडाणा,(प्रतिनिधी)-
राष्ट्रीय अनुसुचित जाती, जमाती आयोग, भारत सरकार आणि अनुसुचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात एकमेव मान्यता प्राप्त संघटना कास्ट्राईब राज्यपरिवहन संघटना या बुलडाणा जिल्ह्याच्या कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेकडून नव्यानेच पदोन्नती होऊन बुलडाणा विभागीय राप कार्यशाळा येथे डिवायएमई (उपअभियंता) या पदोन्नतीवर रूजू झालेले आदर्श प्रशासक विनोद ईलामे यांचा बुलडाणा एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेकडून राप विभागीय कार्यशाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी मा. राज्यउपाध्यक्ष तथा जेष्ठ नेते पत्रकार बाबासाहेब जाधव , विभागीयध्यक्ष दिपक मिसाळकर, विभागीयसचिव भारत आराख, विभागीय कार्यध्यक्ष जीवन जाधव,विभागीय कार्यशाळाध्यक्ष महादेव पवार, सचिव नितीन नरवाडे, महीलाध्यक्ष लक्ष्मीताई बंड यांच्या नेत्तृत्वखाली पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पूढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डिवायएमई विनोद ईलामे हे राप महामंडळात आदर्श प्रशासक म्हणून त्यांचे नावलौकीक आहे. सन २००९ साली राप महामंडळात बुलडाणा डेपो मध्ये एडब्लूयस म्हणून रूजू झाले त्यांनी आपल्या कार्यकुशलतेवर पदोन्नती प्राप्त केली व ते वाशीम, मलकापूर, खामगाव, चिखली येथे डेपो मॅनेजर म्हणून उत्कृष्ठ कामगीरी केली.आगार व्यवस्थापक या पदावर कामगीरी करीत असतांना अधिकारी, कर्मचारी, प्रवासी यांचा समन्वय कसा प्रेमाने साधावयाचा व कर्मचाऱ्यांनकडून प्रेमाने मायेचा हात फिरवत त्यांचे सुखदुःख लक्षात घेवून रापचे ही नुकसान झाले नाही पाहीजे प्रवाशांचीही गैरसोय झाली नाही पाहीजे सर्व संघटनाना सोबत घेऊन हा त्रिवेनी संगम साधून प्रेमाचे रसायन पेरणारे प्रेम द्या प्रेम घ्या असे वागणारे व प्रत्यक्षात कृतीत आणनारे हा त्यांचा आदर्श गुण घेण्यासारखा आहे.ज्या ज्या ठीकाणी काम केले आहे ते कर्मचारी आजही त्यांच्यावर प्रेम करतात असे प्रेमरूपी उपअभियंता विनोद ईलामे यांचा प्रेमरूपी एसटी कास्ट्राईब बुलडाणा कडून सत्कार करण्यात आला.
सत्कारास उत्तर देतांना ईलामे म्हणाले की,मी जसा आहे तसाच राहील मी आज पर्यंत माझ्या जीवनात प्रथम रापच्या कामला प्रथम क्रमांक दिला कारण जन्मदाती आपली आई तसी अन्नदाती जीवन वाहिनी ही दुसरी आई म्हणजे जीने आपणांस समाजात मानापानाचे जीवन दिले ती आई म्हणजे आपली लालपरि तीची सेवा करा तीची मनोभानवे सेवा केली तर आपणांस मेवा भेटतो,आपली प्रगती होते. प्रवाशांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सेवा करा प्रवाशी आपले दैवत, अन्नदाते आहे त्यांची सेवा करा प्रेमाणे त्यांना जींका एसटीची प्रगती ती आपली प्रगती समजून चला यश हमखास मिळते. तूम्ही आपले वैयक्तिक, सुखदुःखाचे या रापचे काम घेऊन या मी तूमच्यासाठी केव्हाही हजर आहे मी एक आपल्यातीलच आहे समजून चला एसटीची मनोभावे सेवा करा आज पर्यंत मला प्रशासनात आपण सहकार्य केले तसे पूढेही करा मी सैदव तूमच्या पाठीसी आहे असे आश्वासन दिले.
यावेळी सर्वश्री बुलडाणा डेपोध्यक्ष रवि अवसरमोल, सचिव अशोक गवई, चिखली डेपोध्यक्ष प्रताप वानखडे, सचिव संतोष घेवंदे, मलकापूर डेपोध्यक्ष पी.पी.तायडे, सचिव राजू गुरचवळे, नितीन शेळके, सहसचिव सिध्दार्थ खराटे, जळगांव जामोद डेपोध्यक्ष एस.एस.कळमकर, सचिव आर.एस. तायडे, विभागीय कोषाध्यक्ष जीतेंद्र साळवे, मेहकर डेपोध्यक्ष विनोद वाकोडे, डेपोसचिव समाधान लहाणे, विभागीय महीलासचिव रेखाताई सपकाळ, विभागीय महीलाउपाध्क्षा कीर्तीताई दाभाडे (शेजोळ),अश्विनीताई जाधव, विमलताई जाधव, गजानन जाधव, सुनिल भंडारे, हर्षदिप सोनपसारे, गौतम मोरे, गजानन देशमुख,गौतम जाधव, विजय खंडारे, एस.डी. कुळकर्णी,भाऊसाहेब देशमुख,शाम कऱ्हाले,प्रमोद पवार,गजानन सरदार, केशव बोर्डे, एच.व्ही. खिल्लारे,राहुल जाधव यावेळी जिल्हाभरातील एसटी कास्ट्राईबचे पदाधिकारी, सभासद यांनी त्यांचा सत्कार केला.