भूमिपूजन वेळी प्रा.भगवान शिंदे व पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी बांधकामास पन्नास हजार व एकतीस हजाराचे आर्थिक धम्मदान.
सिंदखेडराजा/बुलडाणा,(प्रतिनिधी)-मातृतिर्थ सिंदखेडराजा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंबेडकरी चळवळीच विदर्भातील प्रमुख केंद्र विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये सिंदखेडराजाचे भूमिपुत्र आंबेडकरी व धम्म चळवळीचे निष्ठावान अनुयायी नागोराव जाधव गुरूजी यांचं कार्य सर्वश्रुत आहे त्यांच्यासोबत सिंदखेडराजा येथील ए.टी.जाधव, धोंडीबा सोनुने, पांडूरंग जाधव, राघोजी जाधव (पेशवे) देवराव जाधव, राघोजी म्हस्के, पांडू जाधव, बाबुराव म्हस्के, भाऊराव जाधव (मिस्त्री), अण्णा म्हस्के, जगन्नाथ म्हस्के, देऊ जाधव, खंडोजी जाधव, झाडू जाधव इत्यादी मोठ्या राजवाड्यातील व लहान राजवाड्यातील बौध्द उपासक, उपासिका हे त्याकाळी एकत्र येऊन त्यांनी बसस्थानका समोरील बुध्द विहाराची निर्मिती १९६४ साली केली व या ठिकाणी बौध्द धम्म विधी-पुजापाठ, प्रार्थणा, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, सामाजिक उन्नतीचे विचार एकत्र येऊन येथे विचार विनिमयाचे कार्य अव्याहतपणे २००९ पर्यंत सुरू असायचे.
परंतु हे बुध्द विहार जीर्ण झाल्यामुळे ते पडले होते.त्यामुळे वरील धार्मिक काम व विचार विनिमयाचे कार्य २००९ पासून बंद पडले.
हे आपल्या पूर्वजांचे नाहीसे झालेले संस्कार रूपी गतवैभव परत प्राप्त करावयाचे या हेतूने सिंदखेडराजा येथील मोठा राजवाडा व लहान राजवाडा येथील सर्व बौध्द उपासक, उपासिका यांनी एकत्र येवून हे पडलेले बुध्द विहार पुन्हा उभारून जे धार्मिक विधी आदि कार्य बंद पडलेले होते ते पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन बुध्द विहाराची निर्मिती करावयाची हे निश्चीत केले.
ही वास्तू सिंदखेडराजा ऐतिहासिक पर्यटन स्थळी राजे लखुजी जाधव यांच्या भूमित बुध्द संस्कार केंद्र म्हणून भर पडावी असे सुशोभित पर्यटन करावयाचे व हे सदर नियोजीत ऐतिहासिक बुध्द विहार लोक वर्गणीतूनच उभारावे या लोकभावने प्रित्यर्थ ३ मिटींग संपन्न झाल्या परंतू ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष बुध्द विहार उभारणीचे कामाची सुरूवात झाली नव्हती. म्हणून
या ऐतिहासिक बुध्द विहाराचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी येथील बौध्द उपासक,उपासिका एकत्र येऊन १४ जूलै २०२४ रोजी मिटींग आयोजित करण्यात आली आणि सर्वांनी एकमताने असे ठरविले की, चांगल्या कामास उशिर कशाला पाहिजे म्हणून आजच सदर बुध्द विहार उभारणीचे कामाची सुरूवात करावी ही एकमुखी मागणी सर्वांनी मान्य केली व सर्वांच्या उपस्थित ३० बाय ३० आकाराची बुध्द विहार भूमीची जागा निश्चित केली आणि नियोजीत बुध्द विहार भूमीचे भूमिपूजन जेष्ठ नागरिक सिंदखेडराजाचे भूमिपुत्र सेवानिवृत्त कॅाटन कार्पोरेशनचे एमडी व्हि.जी. जाधव (अंकल), सेवानिवृत अधिक्षक नारायण बी. म्हस्के, सेवानिवृत्त प्राचार्य व्ही.एन. म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक महेश जाधव, रिटायर मेजर व्दारकिनाथ म्हस्के, सेवानिवृत्त नायब तहसिलदार सुरेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बाबासाहेब जाधव, समाजसेवक तेजराव म्हस्के, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी गौतम जाधव, माजी सरपंच गौतम म्हस्के, शाहीर वसंतराव जाधव, प्रा. भगवान शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत शुभ हस्ते नियोजित विहाराचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
सदर नियोजीत बुध्द विहाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक उपासक उपासिकानी आपआपल्या परिने आर्थिक योगदान देण्याचा संकल्प सर्व नागरिकांनी केला.
या भूमिपूजन प्रसंगी प्रा. भगवान शिंदे यांनी पन्नास हजार रूपये व बाबासाहेब जाधव यांनी आंबेडकरी चळवळीचे स्मृतीशेष नागोराव जाधव (गुरूजी) वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकतीस हजार रूपये बुध्द विहाराच्या बांधकामास आर्थिक धम्म दान दिले.
या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी नगरसेवक योगेश म्हस्के, डॅा. भिमराव म्हस्के, आदर्श शिक्षक प्रकाश म्हस्के, गौतम म्हस्के, कॅान्ट्राक्टर संदिप जाधव, कॅान्ट्राक्टर बोर्डे, बोधाचार्य विनायक काकडे, मगन जाधव, बालू म्हस्के, मधूकर म्हस्के, देविदास जाधव, प्रकाश जाधव इत्यादी असंख्य उपासक हजर होते.