डॉक्टर दाम्पत्याने गायीच्या शेणापासून बनवल्या पर्यावरणपूरक गणेशमुर्ती

0

धामोड : धामोड सारख्या ग्रामीण भागात वैद्यकिय सेवा देत असतानाच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. विश्वास बीडकर व डॉ. शोभा बीडकर या दाम्पत्याने पर्यावरण पुरक गणेशमुर्ती बनवल्या आहेत.
देशी गायीच्या शेणाचा वापर करून त्यांनी या मुर्ती तयार केल्या. या मुर्तींसाठी वापरलेले रंगही नैसर्गिक आहेत.

धामोड येथील सदाशिव बीडकर मेडिकल फौंडेशन माध्यमातून डॉ. बीडकर दाम्पत्याने ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय सुरू करत लोकांना सेवा दिली. वैद्यकिय सेवा देत असतानाच पर्यावरण संरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत त्यांनी आपल्या फौंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदत केली. बदलते राहणीमान व आरोग्याच्या दृष्टीने देशी गायीचे संवर्धन लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी दत्त गोसंवधेन केंद्राची उभारणी केली.
यावर्षी त्यांनी गायीच्या शेणापासून ‘गोवर्धन गणपती’ बनवण्याची संकल्पना केली. त्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करून अल्पावधीत पर्यावरण पुरक अशा गणेश मुर्ती तयार केल्या. या मुर्ती वजनाने हलक्या नैसर्गीक रंग वापरून बनवल्याने या पर्यावरणाला हानी पोहचणार नाही. गणेशमुर्ती कमी किंमतीत उपलब्ध केल्याने मागणी वाढत आहे.
पैसे मिळवणे हा हेतू नसून पर्यावरण संरक्षणासाठी व देशी गायींचे संवर्धन डोळ्यासमोर ठेऊन आम्ही ही संकल्पना राबवली व त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया बीडकर दाम्पत्याने दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here