सातारा/अनिल वीर : डॉ. चंद्रबोधी पाटील यांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांतून प्रसारित होणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने असून हेतुपुरस्सर काही मंडळींनी पसरविण्याचे कटकारस्थान करीत आहेत. अशा संधिसाधू आणि धम्म कार्याच्या विरोधात काम करणाऱ्या स्वयंघोषित पदाधिकारी यांच्या पासून समाजाने दुर राहिले पाहिजे. अशा लोकांना दुर्लक्षित आणि बेदखल करण्याची गरज आहे. असे आवाहन जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पश्चिम आणि कार्यकारिणी यांनी केले आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी दिली.
भारतीय बौद्ध महासभा एकसंघ करण्यासाठी डॉ. ऍड. भिमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभेचे सर्व गटांचे एकत्रिकरण करून ट्रस्टी सदस्य यांनी डॉ.भिमराव आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य केले आहे.डॉ.ऍड भिमराव आंबेडकर आणि ट्रस्टी पदाधिकारी यांनी एकमताने ट्रस्टी चेअरमन पदावर डॉ. हरिष रावलिया, ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन ॲड.सुभाष जौंजाळे तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदावर डॉ.भिमराव आंबेडकर यांची एकमताने निवड झालेली आहे. डॉ.चंद्रबोधी पाटील हे एकाधिकारशाहीपणे वागत असल्याने, हम करे सो कायदा या पद्धतीने इतरांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत आहेत.दिनांक ५/९/२०२३ रोजीच्या कार्यकारिणी सभा ठरावानुसार त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून दूर करण्याचे ठरविले आहे.
तरीही त्यांच्या कामकाजात काहीही फरक पडत नसल्यामुळे दिनांक १४ डिसेंबर २०२३ च्या कार्यकारिणी सभेच्या ठरावानुसार त्यांना संस्थेच्या ट्रस्टी चेअरमन आणि सदस्य पदावरून दूर करण्याचे ठरावास सर्वानुमते मंजूरी मिळाल्यानंतर चेंज रिपोर्ट चॅरिटी कमिशनर मुंबई यांना DYCC/6263/दिनांक २८/१२/२०२३ रोजी सादर केला आहे.त्यामुळे डॉ.चंद्रबोधी पाटील यांना भारतीय बौद्ध महासभेच्या कामकाजात हस्तक्षेप करणेबाबत अधिकार नसल्याने त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भिमराव आंबेडकर यांच्याबद्दल वर्तमान पत्रातून दिलेल्या बातमीवर जनतेने विश्वास ठेऊ नये.आणी अशाप्रकारच्या बातम्या पसरवणाऱ्या प्रवृतींची समाज माध्यमांनी योग्य ती नोंद घेऊन भारतीय बौद्ध महासभेच्या पारदर्शक कारभारासाठी सर्वांनी संस्थेच्या कामकाजात सहभागी व्हावे.असेही आवाहन करण्यात आले आहे.