डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कायम चिरकाल व स्मरणात राहील !

सन २००७ साली संरक्षीत स्मारक म्हणून राज्य शासनाना कडून घोषित

0
फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना चंद्रकांत खंडाईत शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)

सातारा : जगजत्ते ठरलेले डॉ.आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण साताऱ्याच्या भूमीत घेतले असुन तेव्हा राहिलेले घर हे शासनाने आंबेडकरी जनतेच्या ताब्यात द्यावे.त्यामुळे अतित्तोम असे स्मारक निर्माण झाले तर कायमच चिरकाल स्मरणात राहील.तेव्हा शासनाने आंबेडकरप्रेमीच्या ताब्यात द्यावे.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न झाले.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शिक्षण घेत असताना आमणे बंगला येथे राहत होते. सन २००७ रोजी राज्य संरक्षीत स्मारक म्हणून राज्य शासनाने जाहिर केले होते.स्मारकासाठी रु. १ कोटी ८० लाख एवढे मंजूरही केलेले आहे. सदरच्या बंगल्यात अमणे कुटुंबीयांनी पावसाचे कारण सांगून सन २०१३ रोजी जागा न देता हायकोर्टाकडून स्थगिती मिळवली होती. तदनंतर शासनाच्या उदासीनतेमुळे स्थगिती उठविण्याची अद्याप त्यांनी काम केलेले नाही. त्यामुळेच स्मारकाचे काम रखडलेले आढळून येत आहे. तेव्हा आंबेडकरप्रेमी यांच्या भावनेचा व अस्मितेचा प्रश्न असल्याने शासनाने योग्य ती लवकरात लवकरात कार्यवाही करून न्याय द्यावा. अशी आग्रही मागणी होत आहे.

त्यासाठी तातडीने स्मारक ताब्यात देण्यात यावे. सातारा शहरातील सदरबझार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेत असताना ज्या इमारतीत रहात होते. त्या इमारतीचे स्मारकात रुपांतर व्हावे. ही अनेक वर्षाची मागणी आहे.तेव्हा याच अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीतीच्या माध्यमातून सन २००४ पासून सतत पाठपूरावा चालू आहे. कोर्टाचे कारण सांगून ताब्यात घेण्याची प्रक्रीया पुर्ण केली नसल्याने आंबेडकरी अनुयायी यांच्यामध्ये तीवृ स्वरूपाची नाराजी आहे.त्यामुळेच पुन्हा एखदा राज्य शासनाला जाग आणण्यासाठी व राज्य शासनाने राज्याचे अँटर्नीजनरल, राज्याचे विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणी सरकारी वकील यांच्याशी चर्चा करून सदरची केस तातडीने चालवून स्मरक ताब्यात घेण्याची कार्यवाही करावी. या प्रमुख मागणीकरीता आंदोलन आयोजीत केलेले होते.तेव्हा त्वरित कार्यवाही करून आंबेडकर जनतेच्या ताब्यात द्यावे.अन्यथा,यापुढे विविध पातळीवर जनआंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आला आहे. तरी हा लढा फक्त स्मारक समितीपुरताच राहिलेला नाही. तर हे काम सातारा जिल्ह्यातील आंबेडकरवादी विचारांच्या सर्व अनुयायी यांचे आहे.त्यामुळे  आंदोलनात विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते सहभागी झाले होते. समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी रमेश इंजे, प्रकाश खटावकर,प्रकाश तासगावकर,भरत लोकरे, पी.डी. साबळे, सुभाषराव गायकवाड, गणेश कारंडे,अनंत वाघमारे, सुनील त्रिम्बके, अशोक नागटिळक,तुकाराम गायकवाड, भाऊ मोहड,विजय मोरे,भागवत भोसले,शामराव बनसोडे,अनिल वीर,सुधाकर  काकडे,मुरलीधर खरात,सौ. कविता कांबळे,आशा यादव,द्राक्षा खंडकर,प्रकाश कांबळे, मिलिंद सावंत,सुनील निकाळजे, श्रीरंग वाघमारे,वामन गंगावणे,ऍड. विलास वहागावकर, दिलीप फणसे,नंकुमार काळे, दिलीप सावंत,संतोष मोरे आदी आंबेडकरप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here