मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागार्तंगत देण्यात येणारा राज्यस्तरीय डा.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे आणि त्यांच्या सूविद्य पत्नी सौ.निलिमा साठे-शिंदे यांना जमशेटजी भाभा नाट्यगृह नरीमन पोंईट मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमूख्यमंत्री अजितदादा पवार, क्रिडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे,आमदार भरतशेट गोगावले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या प्रमूख उपस्थीतीत सामाजिक कार्यात मौलीक कार्य केल्या बद्दल प्रदान करण्यात आला.
विलास शिंदे लोकभारती समाज सेवा संस्थेच्या माध्यमातून साडे चारसे बचतगटाच्या माध्यमातून पाच हजार महिला व शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न केला आहे.आदिवाशी लोकांना त्यांचे वनजमीनी मिळण्याकामी त्यांचे प्रबोधन केले आहे.तसेंच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे विभागीय परीक्षक होते.दलित आदिवाशी भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऊत्तर महाराष्ट्रात विविध संस्थाच्या माध्यमातून कार्य केले आहे.या कार्याची शासनाने दखल घेऊन त्यांना डा.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पूरस्कार देवून सन्मान केला आहे.या बद्दल सर्व स्तरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे.