देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
वडार समाजाला वर्षभर 200 ब्रास दगड काढण्याची राज्यशासनाच्या आदेशानुसार परवानगी असताना देहरे ता.नगर येथिल रेवननाथ शालिकराम धनवटे या तरुणाचा ट्रॅक्टर अडवून जप्त केला. ट्रॅक्टर सोडण्यासाठी राहुरी तहसीलदाराच्या मनमानी कारभाराला वैतागून रेवननाथ शालिकराम धनवटे (वय 41 वर्षीय) वडार समाजाच्या युवकाने आत्महत्या केली आहे.तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.असा पविञा संतप्त नातेवाईकांनी घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरीचे तहसिलदार एफ.आर. शेख यांनी वडार समाजास राज्यशासनाच्या आदेशानुसार 200 ब्रास दगड काढण्याची परवानगी असताना. ट्रॅक्टर पकडला त्याचवेळी उत्खनंची रीतसर परवानगी दाखविली.असे असताना हि त्याला त्याचे वाहन ताब्यात न देता जप्त करण्यात आले. विनंती करुनही वाहन ताब्यात मिळत नसल्यामुळे नैराश्य पत्कारुन हा युवक दोन दिवसापासून बेपत्ता झाला होता.रविवार 11 डिसेंबर रोजी या युवकाची मृतदेह नेवासा येथिल नदीपात्रात आढळून आला आहे.
मृतदेह नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.या तरुणाच्या आत्महत्ये मागिल कारण ऐकुण सर्वांनाच धक्का बसला आहे.संतप्त नातेवाईकांनी राहुरीच्या तहसिलदारांनी दगड वाहतुक करणारा ट्रँक्टर पकडून जप्त केला.दगड वाहतुकीचा परवाना दाखवूनही तहसिलदार शेख यांनी ट्रँक्टर सोडला नाही.रोजी रोटी बंद पडणार असल्याने नैराश्य पत्कारुन सदर तरुन गेल्या दोन दिवसापासुन बेपत्ता झाला होता.ननेवासा येथिल नदीपाञात आत्महत्या केली.
संतप्त मृत युवकाच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुरीचे तहसीलदार शेख यांनी डबर उत्खनन करणाऱ्या वडार समाजाच्या युवकाचे ट्रॅक्टर अडवून जप्त केले त्यानंतर त्या युवकाकडे संपूर्ण उत्खनंची रीतसर परवानगी असताना हि त्याला त्याचे वाहन ताब्यात देण्यात आले नाही. या नैराश्यातुन तहसिलदारांच्या जाचाला कंटाळून या युवकाने आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घेतली असल्याचे समजले नातेवाईकांनी सांगितले आहे.
संतप्त नातेवाईकांनी राहुरी येथील तहसीलदार शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.असा पविञा संतप्त नातेवाईकांनी घेतला आहे. नेवासा तालुक्यात नेवासा ग्रामीण रुग्णालया संतप्त नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.