शिर्डी : कौटुंबिक वादातून जावयानेच सासरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात मारेकऱ्याच्या पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यु झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना शिर्डी परिसरात सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये वर्षा सुरेश निकम (वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (वय २५) आणि हिराबाई धृपद गायकवाड (वय ७०) हे मयत झाले
असून योगिता गायकवाड, चांगदेव गायकवाड व सांगिता गायकवाड ही तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
” याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सावळीविहीर येथील वर्षा गायकवाड हिचा विवाह संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम याच्याशी झाला होता. याच्यात थोडे दिवस सर्व अलबेले राहिले. नंतर मात्र दोघांमध्ये कायम किरकोळ कारणामुळे वाद होत गेला. वाद झाला की वर्षा ही माहेरी निघुन जायची. त्यामुळे, निकम याच्या संसारात सासु सासरे, मेहुणी, मेहुणा यांचाहस्तक्षेप वाढत चालल्याचा सुरेश याचा समज झाला होता .
गेल्या काही दिवसांपुर्वी नवरा बायकोत पुन्हा वाद झाले होते . त्यावेळी वर्षा हीने संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि सावळीविहीर येथे निघुन गेली होती. त्यामुळे तिचा पती सुरेश तिच्यावर प्रचंड नाराज होता. त्यामुळे सासुरवाडीच्या सर्व कुटुंबालाच संपवायचे अशा हेतूनेच आरोपी सावळीविहीर येथील गायकवाड यांच्या घरी रात्री अचानक हजर झाला . या अगोदर त्याने आपल्या पत्नीस फोन केला होता. बुधवार दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी त्याने एक धारधार चाकु खरेदी केला. काही झालं तरी आता यांचे सगळे
कुटुंब संपवायचे असा निर्धार त्याने केला आणि रोशन निकम यास घेऊन त्याने थेट सावळीविहिर गाठली. रात्री ११:३० ते १२ वाजण्याच्या सुमारास ते सासरवाडीला पोहचले.
रात्रीचे जेवण करुनगायकवाड कुटुंब झोपी गेले होते. इतक्या रात्री जावई येतील आणि असे काही करतील अशी शंका देखील त्यांच्या मनात आली नव्हती. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आरोपीने दार वाजवले , दरवाजा उघडताच आरोपीने जो समोर येईल त्याला चाकूने भोसकण्यास सुरवात केली . त्यामुळे घरामध्ये एकाच कोलाहल उडाला
त्याची पत्नी समोर दिसताच तिच्यावर देखील त्याने हल्ला केला. आरोपीने एकापाठोपाठ एक असे सहा
जणांवर सपासप धारदार शास्राने वार केले. यात त्याची पत्नी वर्षा निकम, मेहुणा रोहित गायकवाड आणि आजेसासु हिराबाई गायकवाड हे जागीच मृत्यूखी पडले . तर मयत वर्षाची बहीण योगिता गायकवाड, वडील चांगदेव गायकवाड आणि आई सांगितागायकवाड हे तिघे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके घटनास्थळी आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी त्वरित तपासाचे चक्रे फिरवत वेगवेगळे पथक तयार करुन स्वत: आरोपीचा मागोवा घेणे सुरु केले. गुरुवारी पहाटे पोलीस पथके संगमनेर येथील आरोपीच्या घरी पोहचले मात्र आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी अधिक तपशीवर चौकशी करीत मुख्य आरोपी संतोष निकम व रोशन निमक यांना नाशिक येथून ताब्यात घेतले .
पुढील तपास पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्यामार्गदर्शनाखाली सुरु आहे.