दबावाखाली येऊन जर मराठ्यांशी दगाफकटा केला तर सुट्टी देणार नाही – मनोज जरांगे

0

विशेष प्रतिनिधी
जालना : राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन जर मराठ्यांशी दगाफकटा केला तर सुट्टी देणार नाही असं थेट आव्हान मनोज जरांगे  यांनी दिलं. गेल्या 70 वर्षांपासून आम्ही कष्ट करतोय आणि त्यांच्यावर अन्याय केला जातोय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेवटचं सांगतोय, मराठ्यांना आरक्षण  द्या, अन्यथा परिणामांना सामोरं जा असा इशाराही त्यांनी दिला.
मराठ्यांना आरक्षण घेणार आणि तेही ओबीसीमधूनच घेणार, त्याला काय करायचं ते कर असा इशारा जरांगे यांनी छगन भुजबळ आणि राज्य सरकारला दिला. जालन्यातील भव्य सभेत मनोज जरांगे बोलत होते.

जालन्यातील लाठीचार्जवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आया बहिणींवर हल्ला झाला, त्यांचे रक्त सांडले. इतके निष्ठूर सरकार आम्ही पाहिलं नाही. एकीकडे म्हणता की आमच्यावरील गुन्हे मागे घेणार, दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. तीन महिन्यानंतर आमच्या लोकांना अटक केली. लातूरमध्ये असं काय झालं की त्या ठिकाणी संचारबंदी केली. लातूरला आम्ही कार्यक्रम घेणारच. आमच्या लोकांवर अन्याय केला, पुढच्या काळात आम्ही सहन करणार नाही. एका व्यक्तीच्या दबावामुळे जर हे सगळं होत असेल तर सहन करणार नाही.”

अंतरवलीतील गुन्हे दोन दिवसात आणि महाराष्ट्रातील गुन्हे एक महिन्यात मागे घेणार होते. उदय सामंत, धनंजय मुंडे साहेब, संदीपान भुमरे साहेब, अतुल सावे साहेब यांनी सांगितले आपली गुन्हे मागे घेण्यात येतील, एकालाही अटक होणार नाही असं सांगितलं होतं. मग कार्यकर्त्यांना का अटक केलं? तुम्ही आमच्या लोकांना अटक का केलं, MCR झालं असताना PCR का घेतला, त्याने हिंगोलीत म्हटल्यामुळे तुम्ही PCR घेतला का?

24 डिसेंबर पर्यंत शांततेत आंदोलन करा

मराठा शांत आहे, आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत शांततेत आंदोलन करा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. 24 तारखेला सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. तसं नाही झालं तर काय करायचं ते पाहू असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.

ओबीसी आरक्षणाचा फायदा फक्त एका जातीला

खालच्या जातींना हा आरक्षण घेऊ देत नाही. ओबीसी आरक्षणाचा आणि फंडाचा फायदा हा फक्त एका जातीला झाला आहे. 2000 ते 2014 या काळात या व्यक्तीने 80 टक्के हिस्सा एकट्याने खाल्ला, इतर 300 जातींना 20 टक्के हिस्सा मिळाला. याला फक्त सभेला धनगर समाज लागतो. आम्ही त्याला म्हटलं की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका जाहीर करा, ते करत नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here