सर्व सामान्यांनेचे बेहाल ः प्रशासनासह शासनास्तरावरही उदासिनता..
नांदेड – प्रतिनिधी
नांदेड शहरात मागील १३ वर्षापासून शहर बस वाहतूक बंद करण्यात आलेली आहे यामुळे नांदेड महानगर पालिकेच्या वतीने सर्व मालमत्ता धारक नागरिकांना वेगवेगळे कर टॅक्स आकारणी करूनही सामान्य जनतेला शहर बस वाहतूक सेवा न देता शहर बस जाणीवपूर्वक बंद ठेवत आहे यामुळे सर्व सामान्य जनतेला,महिला, वयोवृद्ध शाळकरी मुले मुली नांदेड शहरातील वेगवेगळ्या ट्युशनला जाणारी मुले मुली यांना शहरात येण्या जाण्यासाठी केवळ खाजगी ऑटो ने प्रवास करावा लागत आहे यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला आर्थिक बोजा पडत आहे
नांदेड शहरातील सर्व सामान्य नागरिक त्यांच्या अल्प वेतनामुळे आणि शहरातील त्यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या शाळा ,कॉलेज ,ट्युशन ला जाणाऱ्या मुलांच्या वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे कुटुंबासह विस्थापित होत आहेत,मुलांचे शिक्षण बंद करीत आहेत शहरातील ऑटो चालक हे तरोडा ते विष्णुपुरी , सिडको ते तरोडा मार्गावर प्रवास करण्यास शंभर रुपये आकारणी करतात
याप्रमाणे विद्यापीठ ,शासकीय रुग्णालय, इंजिनिअरिंग कॉलेज, या भागात विद्यार्थी विद्यार्थिनी सामान्य जनता यांना तरोडा ते विष्णुपुरी , सिडको ते आनंद नगर, भाग्य नगर ,एमजीएम कॉलेज नांदेड शहरातील नांदेड उत्तर ते नांदेड दक्षिण भागात असा प्रवास ये -जा करण्यासाठी ऑटो ने दोनशे रुपये द्यावे लागतात एकंदरीत हा प्रवास खर्च महिन्याचा सहा हजार रुपये इतका आहे तसेच आमच्या महिलांना, तरुण मुलींना शहरात ये जा करताना परपुरुषांसोबत शेजारी बसून ऑटोने प्रवास करावा लागत आहे .
तसेच रात्री दहा वाजल्या नंतर ऑटो चालकांकडून प्रवास दर हे दुप्पट वाढविले जातात यामुळे शहरात रेल्वे स्टेशन ते सिडको रेल्वे स्टेशन ते भाग्यनगर असा प्रवास करताना एकेरी प्रवासास शंभर रुपये इतके भाडे आकारले जात आहे नांदेड शहरात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून असंख्य विद्यार्थी खाजगी ट्युशन शिकवणी घेण्यासाठी आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे पालक तसेच नांदेड शहरातील सर्व रहिवासी ,वयोवृध,महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना जर शहर बस वाहतूक सुरू असल्यास हा प्रवास खर्च दरमहा ३०० ते ४०० रु इतका अल्प असू शकतो
त्याबरोबरच रात्रीचा त्यांचा होणारा प्रवासही सुरक्षित प्रवास होईल ऑटो चालकांकडून कसलीही आर्थिक लूट पिळवणूक होणार नाही. तसेच यामुळे नांदेड शहरातील वारंवार ट्रॅफिक जाम होण्याची समस्या देखील सुटण्यास मदत नक्कीच होईल अशी अपेक्षा व्यक्त करणारी खंत समाम माध्यमांवर सामाजिक. कार्येकर्ते गौतम जैन यांनी व्यक्त केली आहे
शहरबससेवेसाठी सगळीकडेच उदासिनता ..
या अतिशय महत्वाच्या, दररोज शहर वासियांच्या जीवनात उद्भवणाऱ्या समस्येवर सर्व राजकीय पक्ष,नेते,त्यांचे कार्यकर्ते प्रशासनातील अनेक अधिकारी चिडीचूप आहेत यावर कुणीही आवाज उठविण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे सामान्य जनता मात्र ही आर्थिक पिळवणूक निमूट पणे सहन करीत आहे..
गौतम जैन ,सामाजिक कार्येकर्ता , नांदेड ,