………………………………………………………………
रेणूका मंदिर माहूर परिसर मार्गावर होणार साडेतीन शक्तिपीठे; नारीशक्ती चित्ररथाचे प्रदर्शन
………………………………………………………………
माहूर :(बालाजी कोंडे): प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे नारिशक्ती या चित्ररथाचे विशेष सादरीकरण 9 मार्च रोजी माहूर येथे आयोजित करण्यात आले आहे. जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा व्दितीय क्रमांक मिळाला. साडेतीन शक्तीपीठावर आधारित या चित्ररथाचे प्रदर्शन खास माहूर येथे होणार असून या माहूर शक्तीपीठाच्या चित्ररथाचा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार दि. ०९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रेणुका माता माहूर येथे होणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार, मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी कळविले आहे.
चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना भेट देणाऱ्या भाविकांना, सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी हे प्रदर्शन माहूर येथे होणार आहे.
सर्व नागरीकांनी व भावीकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर मुनगंटीवार, मंत्री, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
माहूर हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पिठ आहे. या शक्तीपीठावर येणारी शक्ती चित्ररथाचे प्रदर्शन होत असल्याने भाविकात मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे तसेच माहूर येथील नागरिकही या चित्ररथ पाहण्यास उत्सुक आहेत. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी हा चित्ररथ पाहून डोळ्याचे पारणे फेडावे असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले आहे. तर माहूरगडावर चित्ररथाचे स्वागत श्री रेणुकादेवी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव,विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव,नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे करणार आहेत.
………………………………………………………………