दिवाळीचा मुहूर्त साधत बक्तरपुरचे भाजपा कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर  प्रभावित होवून कोपरगाव तालुक्यातील बक्तरपूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवार (दि.२४) रोजी दिवाळीचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

यामध्ये राजेंद्र बंडू सानप, विजय चिंधू सानप, सुरेश माधव नागरे, गणेश वाळीबा नागरे, प्रवीण प्रभाकर गंभिरे या भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक डॉ. मच्छिंद्र बर्डे, श्रीराम राजेभोसले, सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे संचालक  खंडेराव सोनवणे, तसेच सोमनाथ सानप, गणेश सानप, शरद गरुड, अरुण डोंगरे, विलास सानप आदी मान्यवर उपस्थित होते.  

मागील काही महिन्यांपासून कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्या कार्यकर्त्यांचे इनकमिंग जोरात सुरु आहे. ना. आशुतोष काळे यांनी तीन वर्षाच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. मतदार संघातील रस्ते, पाणी, आरोग्य असे अत्यंत महत्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत त्यामुळे विकासाचे व्हिजन असलेलं आ. आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करून भविष्यात देखील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

फोटो ओळ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या बक्तरपूरच्या भाजप कार्यकर्त्यांचे स्वागत करतांना आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here