दिवाळी पहाट कार्यक्रमाने गावपण जागवले

0

 उरण दि २(विठ्ठल ममताबादे) : जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळ प्रस्तुत दिवाळी पहाट २०२४ हा कार्यक्रम नुकताच उरण तालुक्यातील वशेणी गावात पहिल्यांदाच संपन्न झाला.  या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रायगड भूषण प्रा.एल बी पाटील,मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे ,वशेणी गावच्या सरपंच अनामिका म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रिती पाटील, साहित्यिक ए.डी.पाटील , मधुबन कट्टा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, साहित्यिक नरेश गणपत पाटील, संजय होळकर, अजय शिवकर, हसुराम म्हात्रे, सुरेंद्र म्हात्रे,निलेश म्हात्रे,डाॅक्टर संचित गावंड, डाॅक्टर कुंजवी म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.

   

दिवाळी पहाट या कार्यक्रमात उरण ,पेण, पनवेल आणि ठाणे परिसरातील गौरी कोरगावकर, कुमारी  हर्षाली म्हात्रे, सानिका पाटील, रमेश थवई, संदीप गावंड, रमणिक म्हात्रे, रमण पंडित, शिवपार्वती भजन मंडळ, भक्ती ठाकूर, रविंद्र खोत, गणेश खोत, गौरीश पाटील,किशोर पाटील, अक्षता गोसावी, अनिल भोईर आणि बासरी बादक प्रकाश बागडे या कलाकारांनी दीपावली आणि भारतीय संस्कृती जतन करणारी सुरेल गीते सादर करून रसिक वर्गाला मंत्रमुग्ध केले. दिवाळी पहाट कार्यक्रमाचे औचित्य साधून छोट्या पडद्यावर आणि चित्रपट सृष्टीत नावा रूपाला येऊ पहाणारी वशेणी गावची भूमीकंन्या अभिनेत्री प्रज्ञा प्रमोद म्हात्रे हीचा सन्मान करण्यात आला.

 

 या वेळी रायगडभूषण प्रा.एल बी पाटील सरांनी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कौतुक केले.दिवाळी पहाटेतील सादर केलेली गीते आणि या गीतांना जोडलेल्या निवेदनाने गावपण जागे झाल्याचे मत  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ कार्यकारिणी सदस्य एल बी पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.सदर कार्यक्रमास शर्मिला महेंद्र गावंड , ह.भ.प.अनिल महाराज, निळकंठ महाराज, नंदकुमार महाराज, सेवा निवृत्त प्राचार्य गणपत  ठाकूर, सदाशिव पाटील, संजय होळकर, संजीव पाटील, माजी सरपंच जीवन गावंड , प्रसाद पाटील, शाम ठाकूर, कृष्णा ठाकूर , रेवती गावंड, ग्रामपंचायत सदस्य गणेश म्हात्रे , जयंता पाटील, संग्राम पाटील, प्रितम म्हात्रे, आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here