देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
देवळालीप्रवरा नगरपरिषदेच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला असून या कालावधीमध्ये नगरपरिषदेच्या वतीने विविध सेवा सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी श्री. अजित निकत यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने या कालावधीमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आपले सरकार वेब पोर्टल 392 सेवा अद्यावत करण्यात येत आहे नगर परिषदेच्या वतीने नागरी सेवा केंद्र मार्फत विविध शासकीय सेवा देण्यात येत आहेत, तसेच पोर्टल वरील प्रलंबित अर्ज बाबत निर्णय घेण्यात येत आहेत, जन्ममृत्यू दाखले, विवाह नोंदणी ,दिव्यांग संबंधीची दाखले, तसेच दारिद्र्यरेषेत असले किंवा नसले बाबतचे दाखले देण्यात येत आहेत.दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान च्या वतीने पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत म्हणजेच पीएम स्वनिधी अंतर्गत फेरीवाले व रस्त्यावर फिरून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना रुपये दहा हजार पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे.तरी देवळालीप्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी या पंधरवड्यात विविध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने प्रांताधिकारी तथा प्रशासक अनिल पवार व मुख्याधिकारी निकत यांनी केले आहे.