नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये माता सुरक्षीत अभियान संपन्न.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )
आज या ठिकाणी मला आनंद वाटतो की आज साई संस्थेच्या वतीने माझ्या माता भगिनी करिता माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत अभियान आयोजित करण्यात आले आहे. खर आहे जिच्या उदरी आपण जन्म घेतो ती सूरक्षीत असली पाहिजे कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी असे म्हटले जाते याचा दाखला इतिहासात पाहण्यास मिळतो आपण सर्वजण अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज्यांचे पुतळे पाहतो आशा थोर पुरुषाच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या त्या त्यांच्या मातोश्री जिजामाता आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी राज्याची स्थापना करू शकले, म्हणूनच मी म्हणतो की माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत म्हणापेक्षा माता सुरक्षीत तर देश सुरक्षीत असे म्हटले तर ते वावगे ठरणारे नाही असे स्पष्ट मत साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी व्यक्त केले. ते उरण येथील साई संस्था संचलित नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरोग्य विभाग रा. जी.प. आयोजित माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत अभिया’तर्गत शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी आपले मत व्यक्त केले.ते पुढे म्हणाले या जगात माते शिवाय काही नाही. आई आपल्याला जन्म देते कर्म देते ती सुरक्षीत असली पाहिजे तिचे आरोग्य निरोगी असले पाहिजे ज्या घरची माता सूरक्षीत असले ते घर सूरक्षीत असेल म्हणून मातांचा सन्मानाचा हा दिवस आहे. या साठीच साई संस्थेच्या वतीने आणि रा. जी.प. आरोग्य विभागाच्या सहकार्याने आजचा उपक्रम हाती घेतला आहे, कारण आमच्या तालुक्यातील माता भगिनी जर सूरक्षीत राहतील तरच आमचा तालुका देश सुदृढ बनेल.देशात खरोखरच समृद्धी आणायची असेल तर घरा घरातील माता सुरक्षीत असायला हावी असे त्यानी शेवटी सांगून रा. जी.प. आरोग्य विभागासह डॉ. राजेंद्र इटकर, डॉ. बाबासो कालेल, डॉ. स्वाती म्हात्रे व त्यांच्या टीमचे आभार मानले.
मंगळवार दि. 18 अक्टोबर रोजी नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलमध्ये आरोग्य विभाग,रा. जी.प. आयोजित माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत अभियांतर्गत महिला,स्तनदामाता व किशोरवयीन मुलीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ परिसरातील 70 पेक्षा अधिक महिलांनी घेतला. यावेळी उपस्थित पुरुषवर्गानेही आपली तपासणी करून घेतली.शिबिरचे उद्घाटन साई संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरासाठी उरणचे जेष्ठ पत्रकार तथा नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक प्रदीप पाटील व परिसरांतील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.शिबिरासाठी उरण तालुका आरोग्य विभाग अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बाबासो कालेल, डॉ. स्वाती म्हात्रे, संतोष पगारे, प्राची पाटील, संगीता शिंदे, सुप्रिया पाटील, विलासिनी बोर यांचे विशेष सहकार्य लाभले.शिबिराप्रसंगी डॉ. बाबासो कलेल यांनी “माता सुरक्षीत तर घर सूरक्षीत’ अभियानाचे कार्य व महती विषद करून उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले तर उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची सविस्तरपणे माहिती सांगितली.या तपासणी अंतर्गत रक्तदाब, ब्लड शुगर (मधुमेह), CBC, थायरॉईड फंक्शनल टेस्, लिकर फंक्शनल टेस्ट (LFT-लिक)लीपीड प्रोफाईल (CHOLESTEROL), रीनल फंक्शनल टेस्ट (RFT किडनी), आरए फॅक्टर, आदीची तपासणी करण्यात आली व संबंधित आजारावर मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. शिबीर यशस्त्री करण्या साठी नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूलच्या प्रायमरी विभागाच्या प्रिन्सिपॉल इशिका मॅडम. प्री. प्रायमरी विभागाच्या प्रिन्सिपॉल ज्योती मॅडम, सुवर्णा शर्मा मॅडम, तेजल पठानिया मॅडम, भार्गवी पाटील मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.