दैनंदिन निवडणूक खर्च सादर करण्याचे तहसीलदार अमोल निकम यांचे आवाहन

0

संगमनेर : नुकत्याच पार पडलेल्या ३७ ग्रामपंचायतींच्या वैध,अवैध,माघार घेतलेले, बिनविरोध, निवडणुक लढविलेल्या सर्वांनी  निवडणुक कामी झालेल्या दैनंदिन खर्चाचा अहवाल १९ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करण्याचे आवाहन राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.  

            संगमनेर तालुक्यातील निंबाळे,धांदरफळ खुर्द, जांबुत बु., चिकणी, कोळवाडे, निमगांव भोजापुर, कर्जुलेपठार, मालुंजे, निमगांवजाळी, हंगेवाडी, रणखांबवाडी, निळवंडे, सादतपुर, दरेवाडी, घुलेवाडी, करुले, रहिमपुर, धांदरफळ बु., कनकापुर, वडझरी खुर्द, ओझर खुर्द, डोळासणे, पोखरी हवेली, सायखिंडी ,चिंचोली गुरव, पिंपरणे, वडझरी बु., जोर्वे, कोल्हेवाडी, उंबरीबाळापुर, वाघापुर, खराडी, तळेगांव दिघे, निमोण, अंभोरे, साकुर, जांभुळवाडी अशा एकुण ३७ ग्रामपंचायतीसाठी माहे ऑक्टोंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधुन वगळलेल्या ग्रामपंचायतींची (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या ) सार्वत्रिक निवडणुक दिनांक १८ / १२ / २०२२ रोजी घेण्यात आली असून दिनांक २०/ १२ / २०२२ रोजी मतमोजणी झाली आहे.त्या अनुषंगाने दिनांक २८/११/२०२२ ते दिनांक ०२/१२/२०२२ पावेतो निवडणुकीकामी अर्जदार यांच्याकडून नामनिर्देशन पत्रे भरुन घेणे कामी राज्य निवडणुक आयोगाचे आदेशाप्रमाणे सदर कालावधीत नामनिर्देशनपत्र भरलेले आहेत असे सर्व अर्जदार (वैध, अवैध, माघार घेतलेले, बिनविरोध, निवडणुक लढविलेले) यांचेकडून निवडणुककामी झालेला दैनंदिन खर्चाचा अहवाल  प्राप्त करुन घेण्यात यावा. सदर खर्चाचा अहवाल सादर करण्यास  राज्य निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार दिनांक २०/१२/२०२२ रोजी मतमोजणी झाले पासून ते दिनांक १९/०१/२०२३ पावेतो मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे उक्त नमुद केले प्रमाणे दैनंदिन निवडणुक खर्च व सर्व आवश्यक अहवालास ट्रू वोटर एप्लीकेशनच्या  माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने सादर करुन त्याची प्रिंटआऊट काडून व त्यावर उमेदवार / अर्जदाराने स्वाक्षरी करुन नमुद केलेल्या विहीत मुदतीत संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडेस सादर करावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here