दौंड साखर कारखान्यात दोन कामगारांचा भाजून मृत्यू !

0

दौंड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी मालकी असलेल्या दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लिमिटेड (Daund Sugar Private Limited) या साखर कारखान्यात दोन कामगार मजुरांचा गरम पाण्यात पडून भाजून मृत्यू झाला . गणेश सिताराम शिंदे आणि संदीप कुंडलिक गरदडे अशी या मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.  

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास हे दोघे कामगार कारखान्यात उसाचा रस तयार होते, वाफ तयार होते त्याठिकाणी पाणी मारण्याचे काम करत होते. संदीप गरदडे हा पाणी मारण्याचे काम करीत असताना पाय घसरून खाली असलेल्या गरम पाण्यात पडला. तर आपला सहकारी पाण्यात पडल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या गणेश शिंदे याचाही त्याला वाचवताना मृत्यू झाला.  गरम पाणी भाजून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान दौंड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here