द्या एक मदतीचा हात ! उपक्रमास मिळाली उरण तालुक्यातील  जे एन पी टी – एस सी / एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोशिएशनची भरीव साथ 

0

 रा. जि. प.  शाळा – हातोंड शाळेतील विद्यार्थ्याना शैक्षणिक ,क्रीडा साहित्य आणि खाऊ वाटप.

 उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा परिषद – शाळा – हातोंड , ता. सुधागड , जि.  रायगड येथे , हातोंड गावचे सुपुत्र राजेंद्र रघुनाथ वाघमारे (पोलीस हवालदार – बिनतारी संदेश विभाग , मुंबई ) यांच्या प्रयत्नातून , आणि  प्रमोद पवार खोपोली यांच्या विशेष सहकार्यातुन , उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे  एस सी ,एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोशिएशनच्या माध्यमातून , हातोंड शाळेच्या विद्यार्थ्याना दिला मुलांच्या सर्वांगीण विकासाकरीता शैक्षणिक साहित्य , क्रीडा साहित्य देवून एक आदर्शवत मदतीचा हात देण्यात आला.

        या प्रसंगी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून , दिप प्रज्वलन करून , पुष्प अर्पण करण्यात आले.  शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यानी सुंदर असे स्वागत गीत गावुन सर्व मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत केले. 

       शाळेचे मुख्याध्यापक – अजितसिंह पाटील यांनी स्वागत करून , शाळेचा प्रवास आणि शाळेत दुर्गम भागातून आदिवासी वाड्या वस्त्यातुन मुलं शाळेपर्यंत पोहचेपर्यंत त्याच्या प्रवासातिल आणि त्यांच्या पालकांच्या आर्थिक सामाजिक अडचणीवर प्रकाश टाकून , मुलांना समाजातिल तुमच्यासारख्या आदर्शवत व्यक्ती व संघटनाकडून मदतीचा हात देण्याची गरज का आहे.  हे प्रकर्षाने सांगितले. हा उपक्रम साध्य करण्यासाठी प्रमोद पवार  , विभव कांबळे  आणि देवानंद पवार  यांच्याशी सातत्याने गेली पंधरा दिवस सातत्याने संपर्कात राहुन हा उपक्रम यशस्वी होत आह. हातोंड गावचे सुपुत्र पोलीस हवालदार – राजेंद्र वाघमारे हे गेल्या सहावर्षांपासून सतत प्रयत्न करून अनेक व्यक्ती आणि संस्थाच्या सहकार्यांतून आमच्या शाळेस आणि विद्यार्थ्याना सर्वोतोपरी मदत करीत आहेत. त्यांचा सामाजिक संपर्क दांडगा असून ते लोकप्रिय असे समाजातील विश्वासु घटक आहेत.  त्यामुळेच त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून , त्यांनी सुरू केलेला द्या एक मदतीचा हात या उपक्रमास शेकडो हात मदतिला धावुन येत आहेत. त्यापैकी आपण आणि आपली संघटना देखिल आहे. या प्रति मी , आमचे सर्व सह शिक्षक , केंद्र प्रमुख आणि विद्यार्थी ग्रामस्थ आपले सर्व मान्यवरांचे रुनि आहोत.असे मत व्यक्त केले.

       या प्रसंगी बोलताना राजेंद्र वाघमारे म्हणाले की , हे माझे गाव , आणि हीच माझी शाळा ही आदर्शवत असावी.  या शाळेत शिकत असणाऱ्या मुलांना शहरातील मुलांसारख्या सुविधा मिळाव्यात हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. ही शाळा जरी इयत्ता सातवी पर्यंत असली तरी या शाळेतून शिकुन पुढील शिक्षणास बाहेरच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांना देखिल शैक्षणिक मदत करीत राहू. मुलांनी त्यांच्या पालकांनी आपल्या अडचणी आमच्या समोर किंवा शाळेतील शिक्षकांपर्यंत पोहचवाव्यात. या शाळेत शिकायला येणारी मुलं ही दोन ते चार किलोमीटर अंतरावरून पायी चालत येत असतात. आमचे शिक्षक बहुतेकवेळा या मुलांना स्वतः च्या मोटर सायकलने ने आन करतात. मुलं सुखरूप घरी पोहचल्यावर सुट्टी करतात.  मी एकदा या शिक्षकांना चाळणीत वाळू चाळताना पाहिले होते.  सर काय करताय ! सर म्हणाले , शाळेच्या इमारतीचे जोते आणि लादी यांना भेगा पडल्या आहेत.  त्यातील सिमेंट निघाले आहे. या फटीतून साप येतात.  म्हणून ओहलावरुन वाळू गोळा करून आणली आहे ती चाळत आहोत ,सिमेंट आणले आहे. आम्हीच गवंडी काम करून सदर पायटिंग करणार आहोत.  मजुरिने कारागीर घेतले तर दोन हजार रुपये जातील.  हेच पैसे वाचले तर  टेम्पोला  भाडे देवून आमच्या मुलांना  तालुका पातळीवर विविध स्पर्धा मध्ये दाखल करता येईल. त्या वर्षी तालुक्यात  झालेल्या शालेय स्पर्धेत आमच्या या लेकरानी दुसरा क्रमांक पटकावला होता. गुरुजींच्या मेहनतीचं सार्थक करून दाखवलं या धैर्यवान मुलांनी. या खेड्या पाड्यातील डोंगर कपारीतील मुलांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर ही मुलं कुठेच कमी पडत नाहीत.  जे एन पी टी चे एस सी / एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोशिएशन चे उपस्थित सर्व मान्यवरांनी आमच्या या निरागस होतकरू लेकराचे त्यांच्या यथाशक्तीने पालकत्व स्वीकारून मी सुरू केलेल्या द्या एक मदतीचा हात या उपक्रमास सढळ हस्ते साथ दिली. त्या प्रति सर्व मान्यवरांचे मनापासून रुनि आहे.  असेच सहकार्य वर्षांनुवर्ष मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. संस्थेचे सचिव प्रमोद पवार यांनी संपर्क साधून दात्रुत्वाचि पालकत्वाचि संस्थेची भूमिका मांडली.  ही बाब अभिनंदनीय आहे. या शाळेतील मुलांना पुढील शिक्षणाकरीता किमान सहा किलोमीटर अंतरावर जावे लागते.  तसेच 10 वी 12 वी बोर्ड परीक्षेला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.  तिथे राहण्याची आणि तिथं पर्यंत पोहचण्याची प्रवास यंत्रणा योग्य प्रमाणात नसल्याने खूप मोठा अडथळा जाणवतो.  या करीता या शाळेस एक लहानशी स्कूल व्हॅन उपलब्ध व्हावी.  हा संकल्प व्यक्त करीत आहे.  हा संकल्प पूर्ण करण्यास अशीच साथ समाजातील दानशूर व्यक्तींनी संघटनांनी करावी अशी विनंती आणि आवाहन करीत आहे.
      संस्थेचे सचिव - प्रमोद पवार यांनी संस्थेचे कार्य व घेत असलेली जबाबदारी सांगितली.  आम्ही नियमितपणे हे कार्य सुरू ठेवू , या शाळेने आम्हांला सेवेची संधी उपलब्ध करून दिली.  त्याप्रति आभारी आहोत.असे मत व्यक्त केले.प्रमोद पवार हे संगीतप्रेमी आसल्याने गर्जा  महाराष्ट्र माझा हे गीत गावुन ऊर्जा निर्माण केली. साधना धिवार मॅडम यांनी हम होंगे कामयाब एक दिन हे गीत गावुन मुलांची मने जिंकली. संस्थेचे अध्यक्ष देवानंद  पवार यांनी सांगितले की , आम्ही मंडळी देखिल तुमच्यासारखे किंवा काही प्रमाणात कमी असेच हलाखितुन शिक्षण घेवुन इथं पर्यंत पोहचलो आहोत. शैक्षणिक प्रगती शिवाय कोणताही विकास आणि यश साधता येणार नाही. आपले जीवन सुंदर सुखी करायचे असेल तर मुलांनो खूप शिका आणि मोठे व्हा.  तुमच्या या हातोंड गावा शेजारी असलेले महागावचे आमचे मित्र  प्रभाकर कांबळे यांची कन्या सिम्बॉयसिस विद्यापीठातून एल एल बी झाली.  विदेशात जावून एल एल एम केले , आत्ता ती बॅरिस्टर होण्याकरीता पुन्हा विदेशात शिकायला गेली आहे. त्या ताईचे आदर्श घेवुन तुम्ही देखिल शैक्षणिक भरारी घ्या.  तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम आम्ही मंडळी करण्याचा प्रयत्न करीत राहू.  संस्थेचे खजिनदार विभव कांबळे म्हणाले की , आम्हांला या गावी या शाळेस भेट देवून जाणीव झाली की , शहरातला भारत (इंडिया) वेगळा आहे आहे. आणि खेड्यातला  भारत वेगळा आहे.  

      शाळेतील मुलांनी मान्यवरांच्या प्रत्येक कृतिशील कार्याला दातृत्वाच्या हाताला हर्ष आनंदाने उत्स्फूर्त साथ दिली. साधना ताईना लहान लेकरं प्रेमानं मायेचा आधार म्हणून कवटाळून आमच्यावर असेच प्रेम असू द्या अशी माय ममतेची सावली द्या. असे जनुकाहि सूचित केले.

      या प्रसंगी जयवंत ढवळे मुख्य व्यवस्थापक (प्रशासन )व सचिव जे एन पी टी.,मनीषा जाधव मॅडम (प्रबंध कार्मिक आणि औद्योगिक संबंध ),  संजीव पगारे  (उप प्रबंधक कार्मिक ),देवानंद पवार(संस्था अध्यक्ष ),प्रमोद पवार (संस्था सचिव ),विभव कांबळे (संस्था कोषाध्यक्ष ),शंकर शिंदे (उपाध्यक्ष ),संदीप कांबळे (सहसचिव ),धनंजय धकिते (सह खजिनदार ),  कार्यकारिणी सदस्य :-संजीव पगारे,सुभाष ठाकरे ,बापू जाधव, राजेश सोनकुसरे,विल्सन सिंग,विनय पवार,अरुण बोकाडे,साधना धिवार ,उज्वला निकालजे, नरेश कोळी,निवास कांबळे आदी मान्यवर असोशिएशनच्या वतीने उपस्थित होते.

     या दातृत्वाच्या उपक्रमास ग्रुप ग्राम पंचायत – हातोंडच्या ग्रामसेविका ज्योती मदने,घनश्याम हाके (केंद्रप्रमुख चंदरगाव ), स्वाती मोरे  (अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती ),अर्चनाताई वाघमारे,रोहिणी भांडीलकर ताई ,आकाश भांडीलकर(शिक्षणतज्ञ शाळा व्यवस्थापन समिती ) तसेच शाळेय  शिक्षक वर्ग अजितसिंह पाटील (मुख्याध्यापक ),योगेश भांड (सहशिक्षक ), अंकुश काकरा (सहशिक्षक )  आदींची उपस्थिती आणि अनमोल सहकार्य व मार्गदर्शन यावेळी लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here