नागरी समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना आजही मूलभूत सुविधा अपूर्णच…
गणेश माने वारणावती ;मणदूर पैकी धनगरवाडा आज स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाली तरी देखील पारतंत्र्यात असल्यासारखे जीवन जगत आहेत. आज त्यांची चौथी पिढी शासन दरबारी न्याय मागत सोयी सुविधा द्या म्हणत आहेत मात्र आजही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
कालच येथे एका व्यक्तीचे मयत झाले. मात्र त्या व्यक्तीचे अंत्य विधी येथील नागरिकांना भर पावसात भिजत करावे लागले. गावचा पत्रकार म्हणून आपण पाहायला गेलो तर अत्यंत दयनीय आणि लाजिरवाण्या परिस्थिती मध्ये इथले नागरिक मयत व्यक्तीला निरोप देत होते. येथील नागरिक मणदूर गावच्या डोंगरी भागामध्ये राहतोय तिथे त्यांना काहीच सोयसुविधा नाहित. अश्या परिस्थितीमध्ये ही ५ वी पिढी जीवन जगत आहेत. अजून त्यांच्या नावावर जमिनी नाहीत. मरण पावलेल्या व्यक्तीला अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नाही.
वन्यजीव विभाग छोट्या छोट्या कारणावरून खूपच त्रास देत आहेत. येथील नागरिकांच्या समस्येकडे लोकप्रतिनधींकडून आवाज उठवून देखील सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. “म्हणून सरकार माय बाप आम्ही जगायचं की नाही हे आता तुम्हीच सांगा असे इथले नागरिक बोलू लागले आहेत”. इथून मागे येथील लोक जमिनीमध्ये खड्डा कडून त्यामध्ये अंत्य विधीचे कार्य करायचे पण अभयारण्यालगत असल्यामुळे जंगली जनावरे जमीनीतून ते मृतुदेह बाहेर काढायचे. त्यामुळे त्यांना अग्नी देण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी येथील नागरिकांना एक स्मशान भूमी हवी आहे. याबाबत अनेक वेळा निवेदन दिली आहेत. त्यावर अजुन काहीच निर्णय घेतला गेलेला नाही. येथील नागरिक जमिनीच्याबाबतील अनेक समस्यांसाठी देखील संघर्ष करतो आहे.
येथील नागरिकांची गैरसोय पाहता त्यांची आर्त हाक ऐकून त्यांना कोणी स्मशान भूमी देते का स्मशानभूमी असेच म्हणावे लागते आहे.
चौकट – शिराळा तालुक्यातील धनगरवाडा मणदूर येथे एक दुःखद दुर्घटना घडली आहे.त्यामुळे एका शेतकऱ्याच्या मृत्यू झाल्यानंतरही येथील नागरिकांना प्रशासनाच्या कचखाऊ धोरणामुळे अंतिम संस्कार ही करता आले नाही .ही बाब माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना शिराळा तालुक्यामध्ये घडली आहे. धनगरवाडा मणदुर येथील नागरिक गेली साठ वर्षे आपल्या जमिनी नावावर होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकप्रतिनिधी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक हेही शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. अनेक वेळा चर्चा बैठका झाल्या. परंतु प्रशासनाकडून धनगरवाडा येथील नागरिकांनी किती काळ आपल्या सुख सुविधेसाठी पाठपुरावा करावा लागणार हे समजलेले नाही. प्रशासनाने तातडीने धनगरवाडा येथील नागरिकाचे असणाऱ्या प्रश्न संदर्भात लवकरच मार्ग काढावा लागणार आहे. तो निर्णय शासनाकडून झाला नाही तर सर्वच नागरिकांना टोकाचे आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.आज मंगळवार दि. १ ऑगस्ट रोजी रक्षा विसर्जन आहे. परिस्थिती लक्षात यावी म्हणून त्या ठिकाणी तालुक्यातील संबधित सर्व अधिकाऱ्यांना बोलवले आहे. लवकरच तहसीलदार,प्रांत व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेणार आहे.
रणधीर नाईक
माजी जिल्हा परिषद सदस्य.