नको असलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार…’ रामराजेंचा भाजप खासदारांना सूचक इशारा

0

सातारा : अजित पवार आणि भाजप एकत्र आल्याने राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. मात्र सातारा जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून जोरदार संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप खासदारांना तसा थेट इशाराच दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर  आणि साताऱ्याचे लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले तसेच माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामधील वाद काही नवीन नाही. आगामी लोकसभेच्या उमेदवारीवरुन पुन्हा एकदा हा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर?

“सातारा आणि माढा मतदारसंघाचा खासदार आमच्याच विचाराचा होईल. मात्र, आमच्याविरोधात असणारे आणि आम्हाला नको असणाऱ्यांचा मी यंदा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असे म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. रामराजेंच्या या विधानाने अजित पवार गट देवेंद्र फडणवीसांचे  टेंन्शन वाढवणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here