नगरच्या पायी दिंडीची गोंदवलेकर महाराज मंदिरात सांगता

0

नगर – सावेडी उपनगरातील शिलाविहर येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज  मंदिराच्यावतीने दरवर्षी गोंदवले (सातारा) येथे पायी दिंडी जात असते. हभप सुंदरदास रिंगणे व रेखाताई रिंगणे यांच्या मार्गदर्शनलाखाली यंदाच्यावर्षीही मोठ्या संख्येने भाविक या दिंडीत सहभागी झाले होते. गेल्या 7 दिवसांत या दिंडीने पायी प्रवास करत आज प.पू.गोंदवलेकर महाराज मंदिरात प्रवेश करुन पालखीने मंदिर प्रदक्षणा पूर्ण केली.

     यावेळी दिंडी चालक हभप रेखाताई रिंगणे यांनी सर्व वारकर्‍यांना श्री गोंदवलेकर महाराजांचे नामाचे महत्व विषद केले. सर्वांचे आभार मानले. यावेळी हभप धनंजय महाराज क्षीरसागर (दौंड), संजय कुलकर्णी, सुदर्शन अडसुरे, अनिल गाडे, माऊली गायकवाड, लहू बडे, नंदू आवारे, अशोक मुळे, राम विधाते, विकास बोरुडे, शेखर खिस्ती, गिरिष कुलकर्णी, राहुल लिमये, शरद बेरड व दिंडीकरी उपस्थित होते.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here