श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने देव,देश,धर्मासाठी प्रेरणा जागृती
येवला, प्रतिनिधी
नवरात्रोत्सव निमित्ताने येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देव,देश आणि धर्मासाठी प्रेरणा जागृत करणारी श्री दुर्गा माता दौड घटस्थापनेच्या मुहूर्तावर आरंभ झाली आहे. रोज सकाळी शहरातल्या विविध भागातून ही दौड काढली जाते. पहिल्या दिवसाच्या सकाळपासून सळसळत्या उत्साहात शेकडो धारकरी व बालगोपाळ,माता भगिनी पहाटे या दौडीत सहभागी होत आहे.हि दौड काळा मारुती रोड वरील श्री रेणुका माता मंदिराजवळून रोज सकाळी ६ वाजता सुरू होते.या दौड दरम्यान जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेवाच्या घोषणाने परिसर दुमदुमून जात आहे.दुर्गा माता दौडीचे पुजन करून आणि ध्वज चढवून दौडचा प्रेरणामंत्र घेऊन शुभारंभ करण्यात आला. यावेळी धारकरी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर विभाग प्रमुख दर्शन भिंगारकर, धारकरी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर लोहकरे, सागर निकम,अक्षय मोरे,प्रविन राणे,आकाश पाबळे, कृष्ण पाबळे,वैभव अनकाईकर,ओम क्षिरसागर रोज याचे आयोजन व नियोजन करत आहेत.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेच्या वतीने घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दुर्गा दौड तसेच सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शहरातील विविध भागातून दुर्गा दौडीचे आयोजन दहा दिवस केले आहे. दुर्गामाता दौड हा पारंपरिक पद्धतीचा उपक्रम आहे.महापुरुषांचा जयजयकार तसेच विविध धार्मिक भक्ती गीतांचे गायन केले जाते.यासह भगवी पताका म्हणून मानाचा भगवा ध्वज ठेवण्यात येतो.शहरातील विविध भागातुन या भागातील महिला रस्त्यावर रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून दौडचे औक्षण करून स्वागत करतात.या दुर्गामाता दौड मध्ये मोठ्या संख्येने हिंदु बांधव व भगिनींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठाण व सकल हिंदू समाज यांनी केले आहे.