नांदेड – प्रतिनिधी – (मारोती सवंडकर)
शहरातील नवा मोंढा बाजार समितीच्या मैदानावर रोज सकाळ-संध्याकाळ हजारो महिला-पुरुष व्यायामासाठी व फिरण्यासाठी नित्यनेमाने येतात. सर्वसामान्य लोक येथील ओपन जीमचा लाभ घेतात. मात्र ओपन जीमचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने अनेक साहित्य तुटले आहे तर काही मोडून पडले आहे. यामुळे येथे येणार्यांची निराशा होते. येथील ओपन जीम दुरुस्त करण्याची मागणी होत असून मैदान परिसरात स्वच्छता ठेवणेही गरजेचे आहे या संदर्भात या भागातील रहीवाशांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत या मुद्याकडे त्वरीत लक्ष देऊन प्रश्न सोडविण्याची मागणीही केली आहे .
नांदेड शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे मोकळी मैदाने अगदी अल्प प्रमाणातच शिल्लक राहीली आहेत ही वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही व नागरीकांना आरोग्यदायी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने महापालिकेने पुढे येत जे काही मोकळी मैदाने व रहदारीची ठिकाण आहेत ती स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे आले पाहीजे असे मत मॉर्निंग वॉकर्स च्या वतीने व्यक्त होत आहे. नवा मोंढा मैदानात नेहमी विविध खेळही खेळले जातात तसेच पोलीस भरतीची मुलंही हे मैदान वापरतात परंतु या ठिकाणी त्याबरोबरच दिवसा व रात्री याठिकाणी बसून दारू पिणाऱ्या .मद्यपींमुळे घाणीत काच व बाटल्यांची आणखीनच भर पडत आहे या बाबीकडे महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासन आदी दोंहोनीही लक्ष घालावे अशी मागणी होते आहे.
शहरात महापालिकेचे स्टेडीअम आहे परंतु सतत मेंटनन्स चे काम गेल्या दशकभरापासून सुरूच आहे त्यामुळे तेथे लोक व्यायामासाठी जात नाहीत. याला पर्यायी मैदान म्हणून नवा मोंढा व आजूबाजूच्या परीसरातील दररोज हजारो महिला-पुरुष सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी येतात. तेथे स्वच्छता असणे गरजेचे आहे, मात्र मैदानाच्या आतील बाजूस प्रचंड घाण आहे. ती स्वच्छ करणे गरजेचे आहे.
मैदानात जिम असून जीम नादुरुस्त झाली आहे, काही व्यायामाचे साहित्य मोडले आहेत. जीमचे साहित्य बसवताना दर्जेदार वाळू, खडी, सिमेंट न वापरल्याने ते उखडून पडले आहेत. याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
खुल्या व्यायामशाळेच्या साहित्याची दुरावस्था
महापालिकेच्या वतीने व्यायामाचे साहित्यही बसविण्यात आले आहे. मात्र या साहित्याची सध्या दुरवस्था झाली आहे. येथील दोन उपकरणे नादुरुस्त झाली असल्याने येथे येणाऱ्यांना त्यांचा वापर करता येत नाही. त्यामुळे ही उपकरणे लवकरात लवकर दुरुस्त करावीत, अशी मागणी केली जात आहे.
या ठिकाणी असलेले चेसिंग बोर्ड, वार्म अप साहित्य ही उपकरणे मागील दीड महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे यावर व्यायाम करण्यासाठी येणाऱ्यांना त्यांचा वापर करता येत नाही. त्यामुळे पालिकेने या साहित्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक राजू रोडे , डॉ. पंडीत नांदेडकर , कैलास हाळे, आनंद कोंडेकर, संजय वानखेडे, सौ. अनिता बासटवाड, सौ.सरस्वती सुर्यवंशी, अनुष्का व्यास यांच्यासह अनेकांनी निवेदनाव्दारे पालिकेकडे केली आहे. या आशयाचे पत्रही त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. तसेच, ओपन जिमची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे ,