नवीन नांदेड मराठी संघटनेच्या अध्यक्षपदी तिरुपती पाटील घोगरे तर कार्यअध्यक्ष पदी रमेश ठाकूर 

0

नवीन नांदेड (प्रतिनिधी):नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाची दि १९ रोजी बैठक घेण्यात आली . या बैठकीत सर्वांनुमते तिरुपती घोगरे पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा मावळते अध्यक्ष रमेश ठाकुर यांनी केेली  . 

 

 नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाची दि १९ रोजी दत्तकृपा मंगल कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती . या बैठकीत मागिल वर्षात संघाकडुन करण्यात आलेल्या विषयावर चर्चा करत पुढील वर्षात संघाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कार्याची यावेळी चर्चा करण्यात आली .त्यानंतर रमेश ठाकुर यांचा अध्यक्षपदा कार्यकाळ संपुष्टात आल्याने अध्यक्षपदासाठी तुकाराम सावंत ‚ अनिल धमने पाटील यांनी  तिरुपती घोगरे पाटील यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव ठेवला या प्रस्तावाला सर्वांनी सहमीती देत त्यांचा निवड केली. 

  यावेळी कार्याध्यक्षपदी रमेश ठाकूर, उपाध्यक्षपदी शाम जाधव, कोषाध्यक्ष सारंग नेरलकर, सचिव निळकंठ वरळे,तर सल्लागार म्हणून तुकाराम सावंत ,किरण देशमुख,अनिल पाटील धमणे  यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले . या निवडीनंतर तिरुपती घोगरे यांचे हार घालुन स्वागत केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here