नांदेड येथे साकारलेली राजमाता जिजाऊसृष्टी महाराष्ट्रासाठी ‘प्रेरणापीठ’ : मुख्यमंत्री शिंदे 

0

राजमाता जिजाऊ सृष्टीच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

         नांदेड प्रतिनिधी :  राजमाता माँसाहेब जिजाऊंचा वैभवशाली इतिहास उलगडून सांगणाऱ्या व महाराष्ट्रासाठी प्रेरणापीठ ठरणाऱ्या राजमाता जिजाऊ सृष्टीचे मा.ना. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले.  यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, मा.खा. हेमंत पाटील, मा.आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव,स्वीय सहायक बालाजी पाटील खतगावकर, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

           

 राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजमाता जिजाऊ सृष्टीचे संकल्पक अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नातून आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या पाठबळ व मार्गदर्शनातून नांदेड येथे साकारलेल्या राजमाता जिजाऊ सृष्टीच्या लोकार्पणचा सोहळा पार पडला. यावेळी सदर राजमाता जिजाऊ सृष्टीच्या सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून दिला. अनेक मान्यवरांची व महिलांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “ही राजमाता जिजाऊ सृष्टी माँसाहेब जिजाऊंच्या शिल्पांच्या रुपात जाज्वल्य इतिहास दर्शविणारी आहे. इतिहासप्रेमी व इतिहास संशोधक यांना प्रेरणापीठ ठरणारी आणि राजमाता जिजाऊंच्या इतिहासाला वाहिलेली महाराष्ट्रातील ही एकमेव वास्तू आहे, या प्रेरणादायी कार्यासाठी मी अविनाश कदम यांचे यानिमित्ताने अभिनंदन करतो,” असे गौरवोद्गार काढले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले, की “ही राजमाता जिजाऊ सृष्टी म्हणजे अविनाश कदम यांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आज लोकार्पणाच्या निमित्ताने स्वप्नपूर्ती होते आहे, स्वराज्यप्रेरिका माँसाहेब जिजाऊंचा इतिहास सांगणारी ही राजमाता जिजाऊ सृष्टी खऱ्या अर्थाने स्वराज्याचे प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ आहे, यानिमित्ताने नांदेडच्या वैभवात भर पडलेली आहे. ऐतिहासिक नांदेड नगरीत अजून एक देखणी आणि इतिहासाचा वारसा सांगणारी वास्तू निर्माण होऊन नांदेड नगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, याचे समाधान आहे.” यावेळी जिजाऊ सृष्टीचे संकल्पक अविनाश कदम यांनी राजमाता जिजाऊ सृष्टी येथे भेटी मुख्यमंत्र्यांचे आणि खासदार अशोकराव चव्हाण यांचे आभार मानले व पाच कोटींचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. या कामी नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर व माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांच्या विशेष सहकार्य लाभले.

         

  याप्रसंगी विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रंगीबेरंगी व आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ.अंकुश देवसरकर, संतोष पाटील गव्हाणे माधवराव देवसरकर सौ जयश्रीताई पावडे,प्रा. संतोष देवराये, सुरेखाताई रावणगावकर, सौ.संगीताताई डक, सौ.सरिता बिरकले, रेखाताई चापले, राजेश मोरे, शिवाजी पावडे, स्वप्निल पाटील तळणीकर, दत्ता पाटील पांगरेकर, सचिन किसवे, तिरुपती पाटील भगणुरे, सदा पाटील पुयड, शिल्पकार व्यंकट पाटील, अजितपाल सिंग संधू, मारुती धोपटे, बाबरे सर, संदीप पाटील, बेग सर, प्रा.गणेश तिडके, अवधूत कदम, इंजि. केशवराव काकडे, गणेश हालकुडे, गणेश सिंह ठाकुर, सुनील डोईजड, ऍड रमेश दात्रक, संदीप पावडे, दिलीप माहुरे, गजानन तेलंग, राज सरकार, डॉ.गजानन पाटील नागेलीकर, श्याम वानखेडे, शिवाजी इंगळे, प्रवीण देवडे, छायाचित्रकार विठ्ठल पा.शिंदे, प्रताप पावडे, राम सोळंके, निलेश कदम यांसह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी तसेच विद्यार्थी,   इतिहासप्रेमी इतिहास संशोधक व सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवर मंडळी व विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

             सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजमाता जिजाऊ सृष्टीचे संकल्पक अविनाश कदम यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.शारदाताई कदम व मुरलीधर हंबर्डे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here