दौड रावणगाव, परशुराम निखळे : आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांनी आदिवासी समाजातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे भविष्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन निवेदन दिले. यावेळी राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन यांनी सांगितले की, नामदेव भोसले आदिवासी समाजासाठी उत्तम प्रकारे काम करीत आहेत. तसेच त्यांनी नागरिकांना रोजगाराची दिशा दाखवून दिली. नामदेव भोसले यांचे समाजासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी आज देखील महाराष्ट्रातील व पुणे जिल्ह्यातील आदिवासी पारधी लोक गावकुसाबाहेर शासकीय सोयी सुविधांपासून वंचित ठेवले गेले आहेत. त्यांना शासकीय सवलतीपासून दुर ठेवल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आदिवासी पारधी समाजातील लोक डोंगर दऱ्यात घराविना, जागेविना, एखाद्या जनावरागत स्वातंत्र्यहीन जीवन गुजारन करत आहेत. तेवढेच काय एखादा व्यक्तीचा मृत्यु झाला तर ते प्रेत दफन करण्यासाठी वन वन भटकंती करावी लागते ही बाब अंत्यत चिंत्ताजनक आहे. सदरची फरफड कुठे तरी थांबावी या कराता महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन यांना आखिल भारतीय आदिम महासंघाच्या वतीने आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी दोनशे पाणी निवेदन दिले. तसे आज पर्यंत आदिवासींचे दुःख थांबावे त्यांना न्याय मिळावा या करीता त्यांच्या दुःखाची फाईल भारताच्या तात्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे तात्कालिन राज्यपाल के. शंकर नारायण, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे राज्यपाल सि.पी.राधाकृष्णन यांच्या पर्यंत पोचवण्याचे काम नामदेव भोसले यांनी निस्वार्थ पणे केले आहे. त्यांनी गेले वीस ते पंचवीस वर्षांमध्ये शेवराई सेवाभावी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आदिवासीचे दु:ख कमी करण्यासठी विवीध उपक्रम घेतात त्यांनी आत्तापर्यंत 90 ते 95 हजार गरीब कुटुंबांना गुन्हेगारीच्या कलंकित जीवनातून मुक्त केले. हजारो गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. तर हजारो कुटुंबाना घरे, जातिचे दाखले, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड मिळवून दिले. अनेक पिढीतांना न्याय मिळवून देण्याचे काम शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नामदेव भोसले हे काम करत आहेत. त्यांचे काम कौतुकास्पद आहे अशा शब्दांत राज्यपाल, सी.पी.राधाकृष्णन यांनी आपले मत व्यक्त केले.
महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम. सी. पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली व महाराष्ट्रातील 34 लाख आदिवासींची कैफीयत आणी दोनशे पानी निवेदन व ” ये हाल, पुस्तक राज्यपालांना देण्यात आले. राज्यातील अदिवासींची परीस्थिती फार चिंताजनक असून त्यांची होणारी फरफड थांबवण्यास यावे व आदिवासींना जाचक अटीतुन मुक्त करण्यात यावे. आदिवासी पारधी समाज हा गावकुसाबाहेर शासकीय सोयी सुविधांपासून दुर ठेवले गेले. त्यांना गावामध्ये स्थिर करण्यात यावे. पुणे जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प घोडेगाव आणि समाजकल्याण कार्यालयामधील भ्रष्टाचार थांबवून त्याची चौकशी करण्यात यावी. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व हवेलीप्रांत कार्यालयाकडुन आदिवासी पारधी समाजाची कामे करण्यास टाळले जात आहे ते थांबावे गरीबांना न्याय मिळावा असे विविध मागण्याचे निवेदन राज्यपाल मा.सी .पी .राधाकृष्णन यांना निवेदन आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी दिले. या वेळी शेवराई सेवाभावी संस्थाच्या व नामदेव भोसले यांच्या कामाची संपुर्ण माहिती पोलीस अधिक्षक मा. विश्व पानसरे साहेब यांनी राज्यपालांना दिली. यावेळी पत्रकार सुनिल भोसले, स्वप्रित भोसले, सचिन भोसले, उपस्थित होते .