सिन्नर : आज दिनांक ०३/०४/२०२३ रोजी नासिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्यांनी नासिक वेतनपथक कार्यालयात जाऊन वेतनपथक अधिक्षक उदय देवरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आढावा घेतला त्यात त्यांनी सांगिल्याप्रमाणे खालील प्रकारची बिले ३१ मार्च२३ रोजी खर्ची टाकण्यात आली आहेत.
१)१५ फेब्रुवारी २३ अखेर पर्यंत कार्यालयात सादर झालेली वैद्यकीय बीले १००% खर्ची टाकण्यात आली.
२) रजारोखीकरणाची १००%बीले .
३)३ कोटी रूपयांची विविध पुरवणी बीले / फरक बीले ज्या क्रमाने जमा झाली आहे त्याक्रमानुसार काढण्यात आली आहेत. (अनुदान कमी असल्याने जेवढे अनुदान होते तेवढी बीले खर्ची टाकण्यात आली.)
४) ज्या कर्मचाऱ्यांची ६ व्या वेतन आयोगाची फरक बीले बाकी होती ती सर्व बीले खर्ची टाकण्यात आली.
5)सातव्या वेतन आयोगाचा 2 रा हप्ता आणि काही शाळांचा 3रा हप्ता (१९०१,५११ इ. हेडवरील शाळांचा )
६) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सातव्या वेतन आयोगाचा पहिला आणि दुसरा हप्ता तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फरक बीले खर्ची टाकण्यात आली.
७) उच्च माध्यमिक शाळांची १५ कोटींची फरकबीले खर्ची टाकण्यात आली.
8)डीसीपीएस / एनपीएस कर्मचाऱ्यांची बीले खर्ची टाकण्यात आली
9) जीपीएफ ची सर्व प्रकरणे काढण्यात आली.
१०)२०% च्या माध्यमिक नविन १३ शाळांचे एकूण१०६ कर्मचाऱ्यांची बीले काढण्यात आली.
११ ) ४०%च्या माध्यमिक जून्या २६ शाळांचे १२० कर्मचारी यांची बिले काढण्यात आली.यामध्ये जानेवारी व फेब्रुवारी २३ ची २०% वाढीव बीलेही काढण्यात आली.
१२)२०%च्या उच्च माध्यमिक च्या जून्या ७६ शाळांचे ३८२ कर्मचारी यांची बीले काढण्यात आली.
१३)आणि ६ फेब्रुवारी २३ च्या शासन निर्णयानुसार २३८ शाळांच्या १२६४ कर्मचारी यांचे २०% वाढीव अनुदानाची बीलेही काढण्यात आली आहेत
वरीलप्रमाणे बीले मंजुर केली असून फक्त फरक बीले व फुरवणी बीले यासाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने फक्त तीन कोटींची बीले मंजूर करण्यात आली आहेत. शिवाय मार्च पेड एप्रिल२३ च्या वेतनासाठी अजून तरतूद नसल्याने माहे एप्रिल २३ मधे होणारे वेतन उशीरा होईल तरीसुद्धा रमजान पुर्वी म्हणजे २३ एप्रिल पुर्वी मार्च पेड एप्रिल चे वेतन अदा करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन वेतनपथक अधिक्षक श्रीयूत उदय देवरे साहेब यांनी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्यांना दिले
यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत ,सचिव एस बी देशमुख उपाद्यक्ष प्रदीप सागळे , श्रीमती परवेजा शेख ,जिल्हा पदाधिकारी के डी देवढे, डी एस ठाकरे बाळासाहेब मो प्रकाश पानपाटील विनायक पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Home महाराष्ट्र नासिक वेतनपथक कार्यालयाकडून कर्मचाऱ्यांची वैद्यकीय आणि रजारोखीकरणाची १००% बीले मंजूर