निधीच्या आकड्यांतून ‘महायुती’ करतेय जनतेची फसवणूक : शशिकांत शिंदेंचा घाणाघात

0

सातारा : सध्यस्थितीत राज्यात अस्तित्वात असलेल्या महायुती सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करून प्रत्यक्षात जनतेची फसवणूक करत आहे. अवकाळीने शेतीचे नुकसान, दुष्काळ, मेडिकल कॉलेजचे अनुदान, आदी मुद्द्यांवर व्यापक जनआंदोलन उभे केले जाणार आहे, असा इशारा शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीने आगामी लोकसभा व आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी भवनात आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सचिन मोहिते, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, नरेश देसाई, राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले,”आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी जो उमेदवार देईल तो निवडून आणला जाणार आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. सध्यस्थितीत राज्यात अस्तित्वात असलेल्या महायुती सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करून प्रत्यक्षात फसवणूक केली आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, दुष्काळाची स्थिती, जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न, साखर कारखान्यांना एफआरपी देण्याचाही विषय यासह इतर विविध मुद्द्यांवर व्यापक जन आंदोलन उभे केले जाणार आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही जिल्ह्याच्या प्रश्‍नांसंदर्भावाज आवाज उठविणार आहे.” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here