निरंकारी फाउंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .

0

उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) : नेत्र तपासणी शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी संत निरंकारी सत्संग भवन,नवीन शेवा उरण येथे आयोजित भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात सुमारे २३० निरंकारी भक्त आणि ग्रामस्थांनी मानवतेच्या भावनेतून मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानव सेवेची भावना दृढमूल झालेली असून ते इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत.

संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक  दत्ताराम पाटील  व प्रेमा ओबेरॉय  (संत निरंकारी चैरिटेबल चे सदस्य) यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे क्षेत्रीय संचालक अशोक केरेकर  तसेच सेक्टर मधील सर्व ब्राँचचे प्रमुख , सेवादल, संचालक व अधिकारी उपस्थित होते. 

नवी मुंबई उरण विभागातून  मनोहर गजानन भोईर(शिवसेना, जिल्हा प्रमुख – रायगड), गणेश घरत व आदि मान्यवर व्यक्तींनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली. संत निरंकारी मंडळाचे उरण सिटी ब्राँचचे प्रमुख समीर सहदेव पाटील यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here