निवडणुकीच्या नावाखाली रिपाईला डिवचून संभ्रम पसरवू नये: स्वप्निल गायकवाड 

0

सातारा : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून वाई मतदारसंघातील विद्यमान आमदार तथा उमेदवार यांचे नेतेमंडळी जाणीवपूर्वक निवडणुकीच्या अनुषंगाने रिपाईला डिवचून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत विधानसभेची निवडणूक जाहीर होताच वाई मतदार संघातून प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न करीत होता.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या माध्यमातून वाई मतदार संघातून उमेदवारी साठी इच्छुक होता. याबाबत वरिष्ठ पातळीवर कल्पना देऊन त्याप्रमाणे वरिष्ठांच्या सूचनाही प्राप्त झाल्या होत्या यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर बैठकाही झाल्या होत्या. पक्षाच्या वतीने सांगण्यात आले होते की उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल आणि सोबतच अशीही सूचना करण्यात आली होती की गरज वाटल्यास अर्ज माघारी घ्यावा लागेल त्यानुसार माझी मानसिकता नव्हती आणि त्यानुसार मी वरिष्ठांना असे कळविले की मी अर्ज भरल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही.

ही माझी वैयक्तिक भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर मांडली. यावर वरिष्ठांनी मला अर्ज भरू नका असे सुचित केले. त्यानुसार अशोक बापू गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अशोक बापू गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीमध्ये तुमचा पक्ष आहे. रिपाईच्या उमेदवारीमुळे महायुतीतील उमेदवारांना फटका बसू शकतो. त्यावर अशोक बापू यांनी त्यांना अर्ज मागे घेण्याबाबत आश्वासित केले. परंतु विद्यमान उमेदवाराला अथवा त्याच्या पक्षाला कोणताही पाठिंबा दिला नाही सोबतच भारतीय जनता पार्टी सोबत झालेल्या बैठकीचे जाणीवपूर्वक फोटो व्हायरल करून विद्यमान आमदार उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे खोडसाळ वृत्त प्रसिद्ध केले जात आहे. सोबतच अर्ज मागे घेण्यासाठी तडजोड झाल्याची खोटी माहिती प्रसिद्ध केली जात आहे. त्यामुळे चुकीच्या खोट्या बातम्यांवर वाई मतदार संघातील जनतेने विश्वास ठेवू नये.

महायुतीतील घटकपक्ष असले कारणाने वरिष्ठाच्या आदेशामुळे आम्ही निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. आणि याबाबत कोणीही गैरफायदा घेऊन संभ्रम पसरवू नये अन्यथा आम्हाला योग्य वेळ माहित आहे त्यानुसार काय वागायचं हे सुद्धा माहित आहे. तडजोडी करणारी आमची अवलाद नाही जनतेची फसवणूक करून भावनांशी खेळण्याचे कृत्य आम्ही करत नाही. चाळीस वर्षाहून अधिक कालावधीपासून सामान्य जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आम्ही जिल्ह्यामध्ये काम करीत आहोत काम करीत असताना घराचा अथवा कुटुंबाचा कोणताही न विचार करता अगदीच घरावर तुळशीपत्र ठेवून, आम्ही जनसामान्यांच्या हितासाठी लढत आहोत हे सर्वश्रुत आहे. आम्ही जनसामान्यांची पिळवणूक अथवा अडवणूक यासाठी वाईच्या विद्यमान उमेदवारासारख्या अनेकांसमोर दंड थोपटले आहेत, आणि जनतेच्या हिताला आणि न्यायाला महत्त्व दिले आहे.

लोकशाहीतील मूल्यांना संपवून जनहितासाठी बाधक ठरणाऱ्या भूमिकांना ठेचण्याचे काम आम्ही करीत आहोत. महायुती सोबत सत्तेत असूनही राज्य शासनाच्या विरोधात लोकशाहीसाठी सर्वाधिक आंदोलन करणारे म्हणून आमच्याकडे बघितले जाते या सर्व बाबींचा उल्लेख करण्यामागचे एकमेव कारण असे आहे की खोट्या बातम्या पसरवून आम्हाला त्रास देऊ नका. याचा त्रास तुम्हाला होईल वाई मतदार संघातील सर्व उमेदवारांना शुभेच्छा  आहेतच. लोकशाहीतील प्रक्रियेनुसार जनता योग्य उमेदवाराला निवडून देईल. पण निवडणुकीच्या आडून बदनामीचे षडयंत्र कोणी करू नये. त्याचे परिणाम भोगावे लागतील. रिपाई आठवले गट यांचे युवा प्रदेश उपाध्यक्ष यांचे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here