एन ए डी एम्प्लॉईज युनियनने कामगार नेते मयूर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सात पैकी सहा जागा जिकूंन सोसायाटी घेतली ताब्यात.
उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे ) : नेव्हल अर्मामेंट डेपोमधील नौसेना गोदीवाड़ातील मध्ये असलेल्या नेव्हल अर्मामेंट डेपो क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नवखे कामगार नेते मयूर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील एन ए डी एम्प्लॉईज युनियनने घवघवीत यश मिळविले आहे. या निवडणुकीत त्यांच्या समोर असलेल्या लाल बावटा प्रणित नेव्हल एम्प्लॉईज युनियन आणि काँग्रेस प्रणित नेव्हल एम्प्लॉईज युनियन अशा बलाढ्य संघटनांनी युती केल्यावरही त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान ,मानावे लागले आहे तर मयूर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील एन ए डी एम्प्लॉईज युनियनने तब्बल सहा जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. या निवडणुकीत एका जागेवरील दोन्ही कडील उमेदवारांना समसमान मते मिळाली आहेत.
या निवडणुकीत निवडून आलेल्या मध्ये कामगार नेते मयूर विठ्ठल म्हात्रे , अविनाश शशिकांत म्हात्रे, गिरीश प्रभाकर म्हात्रे , गिरीश तुकाराम कमलकर ,, सागर एस सोनुने , शिल्पा विपुल थळी आदी निवडून आले आहेत तर संघटनेचे एका सदस्य ओशो पोटे यांना आणि त्यांच्या समोर उभ्या असलेल्या उमेदवाराला समसमान मते पडली त्यामुळे या जागेसाठी टॉस उडवून उमेदवार घोषित करण्यात आला त्यात विरोधी गटाचे उमेदवार विजयी झाले. विरोधकांचे सागर तोतरे नामक एकच सदस्य या निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामुळे मयूर म्हात्रे यांच्या समर्थकांनी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच एकच जल्लोष साजरा केला. आपल्या युनियनला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल बोलतांना कामगार नेते मयूर म्हात्रे यांनी सांगितले की , ज्या भागधारकांनी सत्याच्या बाजूने उभे राहून आपल्या पॅनलवर विश्वास दर्शवला आहे त्यांचा कदापी विश्वासघात होणार नाही तसेच भागधारकांनी व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांनी दिलेल्या या संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले आहे.
नेव्हल अर्मामेंट डेपोमधील नौसेना गोदीवाड़ा विभागात अस्तित्वात असलेली नेव्हल अर्मामेंट डेपो क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी मागील काही महिने वेगवेगळ्या कारणाने गाजत आहे . त्यामध्ये सोसायटीत मोठ्या प्रमाणात अफरातफर झाली असल्याच्या आरोपाने तर परिसरात खळबळ उडवून दिली होती. या अफरातफरी नंतर सोसायटीवर प्रशासक नेमण्यात आला होता. आधीच्या संचालकांनी मनमानी केल्यानेच सोसायटीचे री ऑडीट देखील करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकांनीच या सोसायटीच्या संचालक पदांसाठी नुकतीच सार्वत्रिक निवडणूक घेतली. या निवडणुकीत लाल बावटा प्रणित नेव्हल एम्प्लॉईज युनियन आणि काँग्रेस प्रणित नेव्हल एम्प्लॉईज युनियन अशा बलाढ्य संघटनांनी एकत्रित ताकद लावली होती तर मयूर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील एन ए डी एम्प्लॉईज युनियनने ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढून सत्ताधारी गटाला धूळ चारली आहे. मयूर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील संघटना ही स्थानिक कामगारांची स्वतःची संघटना असून ती कोणत्याही इतर संघटनेशी ऍफिलेटेड नाही असे असतांनाही तब्बल सहा जागांवर या संघटनेने दणदणीत यश मिळविले असल्याने कामगारांनी एकच जल्लोष करीत कामगार नेते मयूर म्हात्रे यांना उचलून घेत आपला आनंद व्यक्त केला.