पत्रकार दिन पाटण विश्रामगृहाच्या गेट बाहेर प्रवेशव्दारात रस्त्यावर साजरा

0

पाटण मधे पत्रकार दिनी पत्रकारांची अहवेलना.. झाल्या प्रकाराचा पाटण ता. पत्रकार संघाने केला निषेध

 पाटण दि 8-(प्रतिनिधी :संजय कांबळे :- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकरांकडून समाज, नेते मंडळी, शासकीय अधिकारी, पदाधिकारी नेहमी अपेक्षित असलेल्या बातम्यांची अपेक्षा करतो. धूर्त स्वार्थी राजकरणी स्वतः च्या स्वार्थासाठी तर शासकीय अधिकारी वरिष्ठांची वाहवा.. समाजात चमकण्यासाठी पत्रकारांना गृहीत धरतात. म्हणजे पत्रकार हे सर्वांसाठी वापरण्याचे साधन झाले आहे. असेच म्हणावे लागेल. कारण ६ जानेवारी रोजी झालेला पत्रकार दिन पाटण विश्रामगृहाच्या गेट बाहेर प्रवेशव्दारात रस्त्यावर साजरा करावा लागला. याच्या पेक्षा वाईट वेळ यापाठीमागे कधी पाटणच्या पत्रकारांवर आली नाही. 

        गेल्या ४० वर्षाच्या परंपरेनुसार ६ जानेवारी २०२४ पत्रकार दिनी पाटण तालुक्यातील सर्व पत्रकार सकाळी १०.३० वा. दरम्यान विश्रामगृह पाटण येथे जमा झाले. विश्रामगृहाच्या प्रांगणात नेहमीप्रमाणे पत्रकार दिनाची तयारी सुरू झाली. आणि विश्रामगृहाच्या शिपाई मामांनी वरिष्ठांचा आदेश सांगितला जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी घेतल्याशिवाय येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेता येणार नाही. यावेळी सर्व पत्रकारांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण राजकीय पुढारी, नेते मंडळी, शासकीय अधिकारी यांच्या बैठकांसाठी, पत्रकार परिषदेसाठी विश्रामगृहात कधीही परवानगीची गरज लागली नाही. मग पत्रकार दिनालाच परवानगी का..? 

          नेहमीप्रमाणे पत्रकार दिन होणारच या उध्देशाने नाईलाजास्तव विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारा बाहेर अधिकार गाजविणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करत रस्त्यावर पाटणच्या पत्रकारांनी पत्रकार दिन साजरा केला. यावेळी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील हे पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यांना विश्रामगृहाच्या प्रवेशव्दारातील रस्त्यावरील चित्र पाहून आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पत्रकारांकडून सर्व हकीकत ऐकून घेतली आणि तडक जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांना फोन करून परस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. जिल्हाधिकारी यांनी देखील परस्थिती जाणून घेऊन पत्रकारांसाठी विश्रामगृह खुले केले. यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष- श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष- नितीन खैरमोडे, योगेश हिरवे, कार्याध्यक्ष- राजेंद्र लोंढे, सचिव- भगवंत लोहार, अ.भा.म.प.प.पत्रकार हल्ला कृती समिती सा.जि. समन्वयक शंकर मोहिते, अ.भा.म.प.प. राज्य महिला प्रतिनिधी- विद्या म्हासुर्णेकर, माजी अध्यक्ष- विक्रांत कांबळे, आनंदराव देसाई, जालिंदर सत्रे, संभाजी भिसे, विलासराव माने, धनंजय जगताप, जेष्ठ पत्रकार-संपतराव देसाई, राजेश पाटील, पत्रकार-  संजय कांबळे, राजेंद्र सावंत, सुरेश संकपाळ, प्रविण जाधव,  सुभाष देवकर, राम कदम, राजकुमार साळुंखे, के. आर . साळुंखे, जयभीम कांबळे, संदेश बनसोडे, उमेश सुतार , निलेश साळुंखे,  श्रीगणेश गायकवाड, दिनकर वाईकर, खाशाबा चव्हाण, सचिन पोतदार 

 

            ६ जानेवारी सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा होत आसताना. पाटण येथे पत्रकारांना पत्रकार दिन रस्त्यावर साजरा करावा लागला. यापेक्षा दुर्दैव नाही. विश्रामगृहा बाहेर पत्रकारांची झालेल्या अहवेलनेची सातारा जिल्हा पत्रकार संघ निषेध व्यक्त करत असून झालेल्या प्रकाराची सातारा जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून संबधितावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

हरिष पाटणे : अध्यक्ष- सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा.

             गेल्या ४० वर्षात झाले नाही ते ६ जानेवारी २०२४ रोजी पाटणच्या पत्रकारांच्या बाबतीत घडले. समाजाच्या हितासाठी नेहमी झगडणाऱ्या पत्रकारांना रस्त्यावर पत्रकार दिन साजरा करण्याची वेळ आली. स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले पाटणचे विश्रामगृह आज सत्तेचा बंधनात आडकले असून ज्या विश्रामगृहातून स्वार्थी राज्यकर्त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून सत्तेची उंची गाठली. त्या सत्ताधारी राज्य कर्त्यांना पडत्या काळात पत्रकारांनी केलेल्या सहकार्याचा विसर पडला आहे. हे दुर्दैव आहे. पत्रकारांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराचा पाटण तालुका पत्रकार संघ निषेध व्यक्त करत असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे पाटण तालुका पत्रकार संघाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here