पत्रकार महाजन यांना मारहाण प्रकरणी आ. किशोर पाटील यांच्या गुंड आरोपींना त्वरित अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरू 

0

जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांची मागणी अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा 

जामखेड तालुका प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना  आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली याचा निषेधार्थ जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निषेध करून तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आरोपीवर कठोर कारवाई होणे बाबतचे निवेदन देण्यात आले 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर तेथील  आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असुन त्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करून, त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी जामखेड येथिल पत्रकारांनी एकत्र येत तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देत आपला तिव्र निषेध व्यक्त केला. 

    यावेळी नासिर पठाण, अशोक निमोणकर, समीर शेख, संजय वारभोग, यासीन शेख, लियाकत शेख, मैनुद्दीन तांबोळी, अशोक वीर, बाळासाहेब वराट,  दत्तराज पवार, संतोष थोरत, नंदू परदेशी, प्रकाश खंडागळे, सुजित धनवे, अनिल धोत्रे, फारूख शेख, पोपट गायकवाड, पप्पू सय्यद, बाळासाहेब शिंदे, नाशिर सय्यद, धनसिंग साळुंके आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थिती होते. 

    समाजहितासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता जणतेचे प्रश्न भ्रष्टाचार व अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांवर आजच्या घडीला अशा गावगुंडांकडून जिवितास धोका निर्माण झाला आहे. आणि भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरील गावगुंडांकडून पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याच्या जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.व सदरील गावगुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी. व आमच्या पत्रकारांच्या भावना शासन दरबारी मांडाव्यात अशी मागणी उपस्थित पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. 

   तसेच यावेळी आपल्या मागण्या शासनाकडे पोहोचवल्या जातील असे अश्वासन तहसिलदार योगेश चंद्रे  व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here