नागठाण्यातील दोन संशयीत बोरगांव पोलीसांच्या ताब्यात ..
नागठाणे दि. १९ (प्रतिनिधी)
नागठाणे विभागातील जेष्ठ पत्रकार संभाजी चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी नागठाणे येथील तिघांवर आज गुन्हा दाखल झाला आहे. चव्हाण यांनी ५ डिसेंबर रोजी विषप्राशन केले होते जवळपास ७ दिवसांच्या उपचारानंतर १२ डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर संभाजी चव्हाण यांच्या कुटूंबियांसह सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीनेही कोल्हापुर परिक्षेत्राचे तत्कालीन आय.जी मनोज लोहिया यांना ,तसेच सातारा जिल्हा पोलीस पोलीस प्रमुख समीर शेख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.
जवळपास एक महिन्यानंतर आज चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचे गुढ उकलण्यात एल. सी. बी व बोरगांव पोलीसांना यश आले असुन सखोल चौकशीवरून चव्हाण यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १)संजय दिनकर जगताप ,२)राजेंद्र दिनकर जगताप अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून राहूल राजेंद्र जगताप फरारी आहे. वैभव संभाजी चव्हाण यांनी फिर्याद दिली असुन या प्रकरणाचा पुढील तपास स. पो. नि. रविंद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पो. उप निरिक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत.