पथक ..

0

फिरतात  भिरभिरी

सतत भरारी  पथक

स्वच्छ हो इलेक्शन 

प्रयास चाले अथक…

धावणां-या नोटांना

रस्ता लागतो सटक

सभ्य वातावरणाला

पोखरूलागे कीटक …

आमचानाही रं पैसा

करतो केवढे नाटक

आम्ही नाही त्यातले

जिम्मेदारी तू  झटक…

मधल्या मध्ये तिसरे

रक्कमा करी  मटक

पैसेघेऊन ते मतदान

उगाच लावता चटक…

भुरळ घाली मतदारां

भुलावणीचे हे चेटक

सरळसन्मार्गावर का

पेरून ठेवले स्पोटक…

दोष देई  सिस्टीमला

उगाचं कसे अनर्थक

पकडली जाता चोरी

कुणीनसतो समर्थक…

कडक नेहमी  पहारा 

जरुरी असे किमर्थक

ब्लाॅट लेस  इलेक्शन 

कामाचे होई  सार्थक….

हेमंत मुसरीफ पुणे. 

  9730306996..

 www.kavyakusum.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here