बुलडाणा जिल्हा रिपाइं आठवले गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे मागणी
बुलडाणा,(प्रतिनिधी)- परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे त्या ठीकाणी ब्राँझ धातूची सविधानप्रत आहे. १० डिसेंबर २०२४ रोजी एका माथेफीरू मनुवादी जातीयवादी विचारसरनिच्या समाज कंठकाने सविधानाची तोडफोड केलेली आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचार धीरेच्या पुरोगामी चळवळीच्या महाराष्ट्रात असा प्रकार होणे हा महाराष्ट्राचा अवमान होणे आहे. कारण संपूर्ण जगामध्ये सविधानाचा गौरव होत असतांना परभणी येथील असे निच कृत्य होत असेल तर ते निच कृत्य करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशा ह्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे कडे देण्यात आले .
यावेळी बुलडाणा रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, जिल्हा महीलाध्यक्ष वंदनाताई वाघ,जिल्हाध्यक्ष घटाखालील उत्तरचे भाऊसाहेब सरदार, जिल्हाध्यक्ष घाटावरिल दक्षिणचे इंजिनियर शरद खरात, विदर्भमहीलाउपाध्यक्षा आशाताई वानखडे, विदर्भउपाध्यक्ष रामेश्वर वाकोडे, संजय वाकोडे, जिल्हाउपाध्यक्ष इंजिनियर राजेश सरकटे, जिल्हायुवाध्यक्ष विजय साबळे, जिल्हाकार्यध्यक्ष प्रा.मुक्तार पठाण, चिखलीतालुखाघ्यक्ष हिम्मतराव जाधव, बुलडाणा शहर महीलाध्यक्षा उषाताई इंगळे, जिल्हासंघटक डॅा. बबन परमेश्वर, युवा नेते प्रकाश पाटील, महासचिव मुरलीधर गवई, रामदास काहाळे, जिल्हाउपाध्यक्ष भाऊसाहेब वानखडे, जिल्हाअल्पसंख्याक आघाडीचे नबाब मिर्झा बेग, बुलडाणा केशव सरकटे, मोताळा बाळासाहेब आहिरे, मलकापूर दिलीप इंगळे, नांदुरा शैलेश वाकोडे, खामगाव निळकंठ सोनुने, जळगांव जामोद संतोष वानखडे, देऊळगाव राजा मुखदयाल, लोणार समाधान सरदार, शेगाव सुरज शेगोकार, संग्रामपूर बाबूलाल इंगळे, सिंदखेड राजा रमेश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
या निवेदनाव्दारे शासन प्रशासनास इशारा देण्यात आला की, जर बुलडाणा जिल्हा रिपाईच्या १३ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाची जर दखल घेऊन आरोपीवर योग्य कार्यवाही न केल्यास जिल्हाभर व देशभर रिपाई आठवले गटाच्या वतीने पॅंथर स्टाईल जनआंदोलन उभे करण्यात येईल व त्या आंदोलनामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील याची शासन व प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला.
यावेळी जिल्हा भरातील तेजराव म्हस्के, भरत रंधवे, रवि शिंदे, रविंद्र काहाळे, दिपक कस्तूरे, पाताळ म्हस्के, आकाश म्हस्के, सैय्यद,भास्करराव जाधव, सविता शिंदे, सुनिता सोनोने, रूपाली कांबळे, दुर्गा सरदार, अनिता खिल्लारे, जोती राजपूत, काताबाई जाधव, संतोष झनके, सुरेश शिंदे, गौतम सोनोने, दत्ता पाटील, कमलाबाई सुरडकर, भाऊ सुरडकर, मिराबाई जैस्वाल, सविता तोमर, कल्यानसिंग पवार इत्यादी जिल्हाभरातील असंख्य रिपाई कार्यकरते पदाधिकारी व सविधानावर प्रेम करणारे निवेदन देते वेळी उपस्थीत होते.