‘परीक्षे’ पेक्षा ‘फतव्यां’चे ओझेच अधिक ! इंग्रजी विषयाची परीक्षेला विद्यार्थी तणावाखाली 

0

फौजदारी गुन्हा ? ; विद्यार्थी आरोपी आहे का ? कॉपीमुक्त परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे :

           ‘कॉपीमुक्त परीक्षे’च्या नावाखाली परीक्षा मंडळ रोज नवनवीन फतवे काढत असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा मंडळाच्या नियमांचेच अधिक ओझे वाटू लागले आहे. राज्यात ११ फेब्रुवारीपासून बारावीची तर २१ फेब्रुवारीपासून १० वीची परीक्षा सुरू होणार आहे. आज १२ वीचा पहिला इंग्रजी विषयाच्या पेपर पुर्वी विद्यार्थी तणावाखाली दिसत असल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. कॉपीमुक्त परीक्षे’च्या नावाखाली कधी पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख महाविद्यालयांच्या शिक्षकांची अदलाबदली. तर कधी ड्रोनच्या सहायाने परीक्षा केंद्राची पाहणी करणे यासह आता तर विद्यार्थ्यांवर गुन्हेगारासारखी वागणूक देणारा नियम जारी करण्यात आला आहे. जर एखादा विद्यार्थी कॉपी करताना आढळला तर त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी मंडळाने केली आहे. दिवसेंदिवस मंडळ कडक नियम लादत असल्याने आता अभ्यासापेक्षा मंडळाच्या नियमांचाच अधिक ताण विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनावर येताना दिसत आहेत.  यापेक्षा मंडळाने विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून नियमावली तयार केली असती तर ते अधिक सोयीचे झाले असते असे मत व्यक्त होत आहे. सोशल मीडियातून होत आहे व्हायरल

■ कॉपीमुक्तच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर रोज वेगवेगळ्या नियमांचा मारा सुरू आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा का परीक्षा मंडळाचे दररोज निघणारे नविन नियम पहायचे.विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची भिती नसली तरी मंडळाच्या नियमांचे मात्र दडपण आहे.या दडपणामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घसरण होणार आहे.घसणाऱ्या टक्केवारीला परीक्षा मंडळास जबाबदार धरण्यात यावे.   

नानासाहेब उंडे – पालक व पत्रकार 

ऐका पाठोपाठ फतव्यांचे ‘मनभर’ ओझे 

          कधी पर्यवेक्षक बदलणे तर कधी केंद्रप्रमुख अर्थात शाळा, त्यातच परीक्षा केंद्र ड्रोनच्या सहाय्याने तपासणी. एवढे कमी की काय आता विद्यार्थ्यांना चक्क गुन्हेगार बनवण्यासाठी कॉपी कराल तर फौजदारी गुन्हे दाखल करू असा थेट इशारा देण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा तर गोंधळ उडतच आहे. मात्र पालकही हैराण झाले आहेत. यामुळे अभ्यास करावा का शिक्षण विभागाचे रोज निघत असलेले फतवे वाचावेत असे विद्यार्थ्यांसह पालकांना झाले आहे.

 विकास गडाख – पालक

    ■ विद्यार्थी गुन्हेगार आहे का ?

फौजदारी गुन्हा दाखल करायला  विद्यार्थी गुन्हेगार आहे का?. जर एखाद्या विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर किंवा बाकाजवळ चुकून कॉपी फेकली तर पुढे काय ? वास्तविक कॉपीमुक्त परीक्षा होणे राष्ट्र हिताचे आहे. परीक्षेत कॉपी करणे हा गैरप्रकारच आहे. मात्र मंडळाने थेट विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई पर्यंत जाणे संयुक्तीक नाही.जर चुकीने एखाद्या परीक्षार्थीकडे वर्गात दुसऱ्या विद्यार्थ्यांने कॉपी टाकली अथवा आढळून आली तर काय तुम्ही थेट गुन्हे दाखल करणार का? असा सवाल आता पालकवर्ग करत आहे. यापेक्षा बोर्डाने अथवा शिक्षण विभागाने वर्षभर विद्यार्थ्यांमध्ये कॉपी करण्याचे दुष्परिणाम समजावून सांगत जनजागृती करणे अधिक योग्य ठरले असते. शिक्षक व पालकांची यासंदर्भात एक कार्यशाळा घेवून काँपीमुक्ती साठी उपाय योजना व सुचना विचारात घेणे गरजेचे वाटते.

 ■ विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त

            कॉपीमुक्त परीक्षा हे बोर्डाचे अर्थात शिक्षण विभागाचे धोरण आहे आणि ते योग्यही आहे. परंतु, हे करत असताना मंडळाने तयार केलेली नियमावली विद्यार्थ्यांवर तणावाची स्थिती निर्माण करणारी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अगोदरच अभ्यासाच्या ओझ्याने विद्यार्थी गांगरून गेले आहेत. वाढती स्पर्धा, करिअरची चिंता, आयुष्याच्या वळणावरील महत्वाची परीक्षा आणि पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दबला जात आहे. दिवसरात्र अभ्यास त्यात शारीरिक व मानसिक दबावाची स्थिती, यामुळे सर्वच विद्यार्थी दडपणाखाली दिसत आहेत. त्यातच शिक्षण मंडळ रोज नवनवे नियम लादत असल्याने पालकांसह मुलांवरील दबाव वाढला आहे.

जालिंदर अल्हाट –पालक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here