❂ दिनांक :~ 17 नोव्हें 2022 ❂*
* वार ~ गुरूवार *
* आजचे पंचाग *
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*कार्तिक. 17 नोव्हेंबर*
*तिथी : कृ. अष्टमी (गुरू)*
*नक्षत्र : मघा,*
*योग :- ऐंद्र*
*करण : तैतील* *सूर्योदय : 06:49, सूर्यास्त : 05:57,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* सुविचार *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*नेहमी चांगली वेळ त्यांचीच असते, जे कोणाविषयी कधीच वाईट विचार करत नाहीत.*
*म्हणी व अर्थ *
*कानामागून आली नि तिखट झाली.*
*अर्थ :- मागून येऊन वरचढ होणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* दिनविशेष *
*जागतिक अपस्मार जागरुकता दिन*
*या वर्षातील ३२१ वा दिवस आहे.*
* महत्त्वाच्या घटना *
*१५२५: मुघल शासक बाबर याने पाचव्यांदा भारत जिंकण्याच्या उद्देशाने भारतात प्रवेश केला.*
*१९३२: तिसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ’लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.*
*१९६६: भारताच्या रिता फरिया हिने जागतिक सुंदरी हा विश्व पुरस्कार जिंकला होता, हा पुरस्कार जिंकणारी ती आशिया खंडातील महिला होती.*
*१९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर*
*१९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या ’नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून निवड*
*१९९४: रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्या पूर्ण करून नवा विक्रम केला.*
*२००६: अमेरिकेच्या सिनेट ने आजच्याच दिवशी भारत -अमेरिका परमाणु तहाला मंजुरी दिली होती.*
*जन्मदिवस / जयंती*
*१९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)*
*१९२२: अमेरिका येथील शरीर विज्ञानशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त स्टेनली कोहेन यांचा जन्म झाला होता.*
*१९३२: शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)*
*१९३८: रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते*
*१९४२: अमेरिकन चित्रपटसृष्टीचे प्रसिध्द निर्देशक मार्टिन स्कोर्सीस यांचा जन्म झाला होता.*
*१९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१९२८: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २८ जानेवारी १८६५)*
*१९३५: गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)*
*१९६१: कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)*
*२०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (जन्म: २३ जानेवारी १९२६)*
*२०१६: आसाम, जम्मू -काश्मीर व अरुणाचल प्रदेश या राज्यांचे पूर्व राज्यपाल श्रीनिवास कुमार सिन्हा यांचे निधन झाले होते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?*
*यवतमाळ*
*भारतातील पहिला सह. साखर करखाना कोणता आहे?*
*प्रवरा नगर (महाराष्ट्र)*
*शुद्ध सोने किती कैरेटचे असते?*
*24 कैरेट*
*मेणबत्तीच्या ज्योतिमध्ये सर्वात बाहेरील भागाची ज्योत कोणत्या रंगाची असते?*
*निळी*
*भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते?*
*दादाभाई नौरोजी*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* बोधकथा *
*टोपीवाला आणि माकडे*
एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना तो थांबतो व झाडाच्या खाली जरा वेळ विश्रांती घेतो. तेव्हा तेथे झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात. थोडया वेळाने, त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या. तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात. शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून निघून जातो.
*तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
श्री. देशमुख. एस. बी,*
*सचिव* नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ* 7972808064
*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,* सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*