📚परीपाठ🌹
❂ दिनांक:~ 23 सप्टेंबर 2022 ❂
🎴 वार ~ शुक्रवार 🎴
*🏮 आजचे पंचाग 🏮*
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद. 23 सप्टेंबर
तिथी : कृ. त्रयोदशी (शुक्र)
नक्षत्र : मघा,
योग :- सिद्ध
करण : गर
सूर्योदय : 06:21, सूर्यास्त : 06:40,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖋 सुविचार 🖋
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
💡आशावाद हा एक विश्वास आहे जो यशाकडे नेतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
⚜म्हणी व अर्थ ⚜
📌गोफण पडली तिकडे,गोटा पडला इकडे.
🔍अर्थ:- कोणत्याही कामात ताळमेळ नसणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆
🌍International Day Of Sign Languages
🌞या वर्षातील🌞 266 वा दिवस आहे.
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
👉१८७३: महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
👉१८८४: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.
👉१८८९: साली विडियो गेम बनविणारी अमेरिकन विश्व प्रसिद्ध कंपनी निनट्याडो ची स्थापना करण्यात आली.
👉१९०५: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी ‘कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.
👉१९०८: कॅनडातील ’युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना
👉१९९२: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस इंद्रजित गुप्ता “उत्कृष्ट संसदपटू’साठीचा “गोविंद वल्लभ पंत पुरस्कार’ पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते प्रदान.
👉२००२: ’मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.
👉२००३: भारतीय वंशाच्या मीरा नायर यांची आशिया अमेरिकी साहित्य पुरस्कारासाठी निवड. त्यांच्या “व्हीडिओ ः स्टोरीज’ या पुस्तकात स्थलांतराबाबतच्या अनुभवांचे कथन करण्यात आले आहे.
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
👉१९१५: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.
👉१९१७: साली भारतीय सेंद्रिय रसायनशास्त्री असीमा चटर्जी यांचा जन्मदिन.
👉१९१९: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०). त्यांची “अ पायलट सर्व्हे ऑफ शिरुर तालुका – ऍग्रो इंडस्ट्रिअल बॅलन्स’, “क्लाइंबिंग अ वॉल ऑफ ग्लास’, “सरदार सरोवर डिबेट’, “ओ नर्मदा’ इ. अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
👉१९२०: प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – नाट्यकला, विज्ञान, अध्यात्म या सर्व क्षेत्रंत सारख्याच अधिकाराने वावरणारे सव्यसाची व्यक्तिमत्त्व, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, हौशी प्रायोगिक रंगभूमीचे अध्वर्यू, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७).
👉१९३५: साली प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि पंजाबी चित्रपट अभिनेता प्रेम चोपडा यांचा जन्मदिन.
👉१९४३: तनुजा – चित्रपट अभिनेत्री
👉१९५०: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय वैद्यकीय सेवाकार्य करणारे डॉ. अभय बंग यांचा जन्म.
👉१९५७: कूमार सानू – पार्श्वगायक
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
👉१८५८: ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी (जन्म: ८ जुलै १७८९)
👉१८६३: साली ब्रिटीश कालीन भारतातील पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी हरियाणा येथील बंडाचे नेतृत्व करणारे महान क्रांतिकारक राव तुलाराम सिंह यांचे निधन.
👉१८७०: प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)
👉१८८२: फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १८००)
👉१९३९: सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक (जन्म: ६ मे १८५६)
👉१९६४: भार्गवराम विठ्ठल तथा ’मामा’ वरेरकर (जन्म: २७ एप्रिल १८८३). सत्तेचे गुलाम, करीन ती पूर्व, हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार आदी नाटके त्यांनी लिहिली. रवींद्रनाथ टागोर, शरच्चंद्र चट्टोपाध्याय, जेम्स बॅरी, हेन्रिक इब्सेन, विल्यम बॅरेट यांच्या साहित्यकृतींचे मराठी अनुवाद त्यांनी केले. विधवाकुमारी, संसार की संन्यास, धावता धोटा या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांना सरकारने “पद्मविभूषण’ सन्मान प्रदान केला होता.
👉१९९९: मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.
👉२००४: डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष (जन्म: २८ जानेवारी १९२५)
👉२०१२: कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के. लाल – जादूगार (जन्म: ? ? १९२४)
👉२०१५: भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
👉महाराष्टातील सर्वांत उंच शिखर कोणते ?
🥇कळसूबाई
👉संत गाडगे बाबा यांचे पूर्ण नाव काय आहे ?
🥇डेबूजी झिंगराजी जाणोरकर
👉संत नामदेवांचा जन्म कोठे झाला ?
🥇पंढरपूर
👉भारतातील सर्वांत लांब पूलाचे नांव काय आहे ?
🥇महात्मा गांधी सेतू
👉बिहारची राजधानी कोणती आहे ?
🥇पाटणा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🕸 बोधकथा 🕸
🙏दर्पण🙏
एक गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’
🧠तात्पर्य – आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात….
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌐 आजच्या बातम्या 🌐
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
👨🏫श्री. देशमुख. एस. बी
🌻सचिव🌻
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ
🙏🌹कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸सौ. सविता एस देशमुख
👩🏫उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.
📱7972808064📱