ठेवू दुर दृष्टी वाचवू पक्षी सृष्टी पक्षीमित्र डॉ.अनिल माळी
सिन्नर :पाडळी , पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून पक्षीमित्र व पर्यावरण जन जागृती करणारे श्री अनिल माळी यांनी शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरण संरक्षणाची गरज निर्माण करण्यासाठी आपल्या व्याख्यानातून त्यांनी विविध ठिकाणी पक्षी क्षेत्रास दिलेल्या भेटी व त्यातून त्यांना आलेले अनुभव सांगतांनी आज अनेक पक्षी नामशेष होत चालले या पाठीमागे अति जंगलतोड त्यामुळे वृक्षांची कमी झालेली संख्या, शहरात निर्माण झालेले सिमेंटचे जंगल व औद्योगिक करणाच्या धुराड्यातून बाहेर पडणाऱ्या धुराचा परिणाम म्हणजे दुषित प्रदूषण अनेक पक्षी जीवांचे जीवन धोक्यात येऊन ते हळूहळू नष्ट होत चालले त्यांच्या जाती आपल्याला टिकवून ठेवायच्या असेल तर त्यांच्या जवळ जा.त्यांच्या शरीर सृष्टीचा,सवयींचा निवासाचा अभ्यास करा अनेक पक्षी मानवी जीवनास उपयुक्त आहे त्यांची उपयुक्तता ओळखा घुबड,गिधाड आज दिसेनासे झाले.व आपणच आपल्या हाताने पर्यावरणाचा ऱ्हास केला.काही पक्षी कीटक नियंत्रण करतात,परागी भवनाचे ते मध्यस्थी असतात, बी प्रसारण करून मानवास मदत करतात म्हणून पक्ष्यांना जपा ते तुम्हांला जपतील अनेक विदेशी पक्षी आपल्या भेटीला येऊन त्यांच्या सवयी व राहणीमानाचा आपण जवळून अभ्यास करतो म्हणून सर्वांनी पक्षी वाचवा वसुंधरा वाचवा व आपल्या पर्यावरणाला पुन्हा सुजलाम सुफलाम बनू या.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी डॉ.अनिल माळी यांच्या प्रगल्भ पक्षी निरीक्षणातून अचूक हेरलेल्या पक्ष्यांचे चित्र रूपाने वास्तविक जीवन विद्यार्थ्यांसमोर मांडून आज आपण पर्यावरणाची करत असलेली हानी मानवास कशी घातक आहे.व पर्यावरण संवर्धनाची व निसर्गाचे विलोभनीय सौदर्य अनुभवण्यासाठी ग्रामीण भागात चला.मुलांनी पर्यावरण संवर्धनाची आम्ही जपणूक करू व निसर्गातील वेगवेगळ्या पक्ष्यांना व प्राण्यांना समजावून घ्या असे सांगितले.
यावेळी श्री भागीनाथ घोटेकर प्राचार्य के.जे.मेहता हायस्कूल नाशिकरोड, याप्रसंगी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर.चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम. कोटकर, आर.टी. गिरी, एम.सी.शिंगोटे,एम.एम.शेख, सौ .सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी. गांगुर्डे, एस. डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते