मला अधिकारी व्हायचंय उपक्रमातून सचिनने जिद्द, मेहनतीच्या जोरावर घेतली उत्तुंग भरारी
सिन्नर : पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील सन 2008-09 मधील विद्यालयात एस एस सी परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी सचिन विश्राम रेवगडे याने विद्यालयात २००५ मधे मला अधिकारी व्हायचंय ह्या उपक्रमातुन प्रेरणा घेऊन मेहनत सुरू केली . प्लास्टिक अभियांत्रिकी डिप्लोमा करून पॉलिमर इंजीनियरिंग मध्ये पदवीचे शिक्षण घेऊन पुढे अविरत शिक्षण चालू ठेवून मला अधिकारी व्हायचं स्वप्न प्रत्यक्षात साकार केले.
कोरोना काळातही नोकरी करत असताना अभ्यास चालू ठेवून 2022 मध्ये एम.टेकला प्रवेश घेतला. व आज पेटंट आणि डिझाईन या महाराष्ट्र शासनाच्या एन टी ए अंतर्गत परीक्षेमध्ये यश प्राप्त करून उच्चस्त नोकरी मिळविली. यात माझ्या आई-वडिलांचे, मुख्याध्यापक एस बी देशमुख व शालेय गुरुजनांचे मला खूप मोठे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. असे सचिनने आपल्या मनोगतात सांगितले. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी सचिन हा शालेय जीवनातच गरीब, हुशार असल्याचे सांगून त्याने आपल्या शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांची जाणीव ठेवून मोठा भाऊ रोहितच्या मार्गदर्शनाखाली आपले स्वप्न पूर्ण करून हे यश प्राप्त केल्याचे सांगितले. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सहसचिव अरुणभाऊ गरगटे यांनी सचिन नावातच खूप मोठे रहस्य दडलेले असल्याचे सांगून अनेक विविध क्षेत्रातील आदर्श विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन कौतुक केले.
शालेय समितीचे सदस्य धनंजय रेवगडे यांनी सचिनचे यश गावासाठी व सर्वांसाठी प्रेरणा असून शालेय विद्यार्थ्यांनी त्याचा आदर्श घेऊन पुढे चालावे असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष टी. एस. ढोली यांनी विद्यार्थी जीवनात सचिन सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आदर्श ठेवून शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षांची तयारी करून आपले ध्येय निश्चित करा यासाठी संस्था सतत तुम्हाला मार्गदर्शन करून तुमच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले.याप्रसंगी वडील विश्राम* *रेवगडे ,आई विमल रेवगडे, चुलते सुदाम रेवगडे, चुलती द्रोपदाबाई रेवगडे, भाऊ रोहित रेवगडे आवर्जून उपस्थित होते. शालेय समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे , सदस्य भगीरथ रेवगडे बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन निकम आर. व्ही. यांनी केले. यावेळी बी. आर. चव्हाण, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.