सिन्नर प्रतिनिधी : पाडळी,पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाचे दोन विद्यार्थी वैभव रामचंद्र जाधव व नवनाथ निवृत्ती पाटोळे यांची नुकतीच इंडियन आर्मी मध्ये निवड झाली. या दोनही विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयात करण्यात आला. याप्रसंगी पाडळी गावचे ग्रामस्थ दशरथ कचरू रेवगडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की सर्व विद्यार्थ्यांनी नेहमी सराव केला पाहिजे.शिक्षकांचा आदर केला पाहिजे. या दोनही विदयार्थ्यांनी जी मेहनत केली त्याचे फळ त्यांना मिळाले असे सांगितले. तसेच ठाणगावचे युवा नेतृत्व प्रतिक शिंदे यांनी ही वैभव जाधव व नवनाथ पाटोळे यांना शुभेच्छा दिल्या या दोघांनी खूप मेहनत घेतली ती मी पाहिली आहे. आर्मीत भरती होणे सोपे नाही त्यासाठी खूप कष्ट व जिद्द धरावी लागते असे सांगितले.
पाडळी गावचे माजी सरपंच व शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रभान रेवगडे यांनीही एका शेतकऱ्याच्या मुलाने इंडियन आर्मीत भरती व्हावे ही खूप अभिमानाची बाब आहे. हा मुलगाही आपल्या वडिलांसोबत नेहमी काम करत असे तसेच त्यांनी कुठलीही ॲकॅडमी लावली नव्हती. स्वतःच्या मेहनतीने इथपर्यंत त्यांनी मजल मारली त्याचे अभिनंदन करतो असे सांगितले. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी वैभव व नवनाथ यांनी गावचे व शाळेचे नाव उंचावले आहे. भविष्यात आपले गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाईल.या दोनही विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपले करियर घडविले शेतकरी कुटुंबातून या दोघाही विद्यार्थ्यांची इंडियन आर्मीत भरती झाली त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो व पुढेही त्यांनी अशीच प्रगती करत उच्च पदापर्यंत मजल मारावी असे सांगितले. यावेळी वैभवचे वडील रामचंद्र दामोदर जाधव, आई अनिता रामचंद्र जाधव तसेच नवनाथचे वडील निवृत्ती रामचंद्र पाटोळे आई विमल निवृती पाटोळे, दशरथ रेवगडे प्रतिक शिंदे, अर्जुन शिंदे, चंद्रभान रेवगडे,बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष टी. के. रेवगडे विद्यालयातील शिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे,आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.*