पैठण,दिं.४:राज्याचे रोहयो तथा औंरगाबाद जिल्ह्यचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांनी संग्रामनगर येथील रेणुका माता मंदिर मध्ये भेट देऊन नवरात्र निमित्ताने आरती केली.
ढोरकीन येथील युवा उद्योजक गणेश पाटील मुळे यांनी संग्रामनगर येथील रेणुका मातेस रोहयो मंत्री संदीपान भुमरे पाटील यांना छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती व्हावी म्हणून नवस केला होता त्यानुसार मंत्री संदीपान भुमरे यांनी रेणुका माता मंदिर मध्ये येऊन त्यांच्या हस्ते आरती करून नवस पूर्ण करण्यात आला यावेळी गणेश पाटील मुळे यांच्या वतीने मंत्री भुमरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले पाटील, सरपंच विष्णू भवर, सुभाष मुळे, रविंद्र शिसोदे, शेखर म्हस्के, राजेंद्र तांबे, अप्पासाहेब लघाने,हभप विठ्ठल महाराज शास्त्री, अमोल एरंडे, अनिल मुळे, उमेश मुळे, दत्तात्र्य पोटरे, धनंजय घुगरकर सह आदी उपस्थित होते.