पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भाविकांसह घेतला संगीत भागवत कथेचा आनंद

0

पैठण,दिं२२(प्रतिनिधी): paithan पैठण तालुक्यातील कारकीन येथे शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्ताने श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा कथा प्रवकत्ते भागवताचार्य विष्णुजी देशमुख महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतुन सुरू असून या कथा सोहळ्यास छत्रपती स़भाजीनगरचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री Minister Sandipan Bhumre संदीपान पाटील भुमरे यांनी भेट देऊन कथा प्रवकत्ते भागवताचार्य विष्णुजी  महाराज देशमुख यांचा सत्कार शनिवार (दिं.२१) रोजी करून भाविकांसह कथेचा आनंद घेतला.

 याप्रसंगी कथा प्रवकत्ते भागवताचार्य विष्णुजी  महाराज देशमुख यांनी सांगितले की,गो सेवा करून परमार्थ साधा,स्री भु्ण हत्या करू नका भगवत प्राप्तीचा एकमेव उपाय भगवत चिंतन असून आई वडीलांची सेवा हिच ईश्वर सेवा आहे गोरगरीब गरजूंना मदत करावी असे सांगितले याप्रसंगी पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा श्रीमद संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा कथा आयोजक बद्रीनाथ पाटील लिपाने यांनी सत्कार केला याप्रसंगी बोलताना पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले की भक्तीमुळे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचला असून वारक-यांच्या संघटना आता युवकांची पिढी घडविण्याचे काम करीत आहे ही बाब कौतुकास्पद आहे श्री संत एकनाथ महाराज श्री क्षेत्र पैठण संस्थानच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे मराठवाड्यातील वारक-यांच्यासाठी भक्तनिवासाची जागा घेण्यात आली असून लवकरच भक्ती निवासाचे काम हाती घेण्यात येणार आहे असे जाहीर केले.

     यावेळी गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज कदम, प्रशांत महाराज धारबळे, कृष्णा महाराज देशमुख,सोपान महाराज जंजाळ, सरपंच रंजित नवले,उपसरपंच जालिंदर पाटील लिपाने, चेअरमन रमेश नवले, कारभारी नवले, तंटामुक्ती अध्यक्ष रफीक पटेल, विठ्ठल मुळे, बाबासाहेब मुळे, सरपंच आत्माराम थोरात , उपसरपंच जावेद कुरेशी,अक्षय मुळे, महेश मापारी, मनोहर लिपाने, बाळकृष्ण लिपाने, शामसुंदर लिपाने, रामभाऊ लिपाने,दत्ता लिपाने, प्रभाकर लिपाने,गोंविद लिपाने सह पंचक्रोशीतील  महिलासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

——–

   चौकट

गेल्या अनेक वर्षांपासून परंपरेनुसार भागवताचार्य विष्णुजी देशमुख महाराज यांच्या नवरात्र महाउत्सवा निमित्ताने कारकीन येथे भागवत कथा सुरू असून पंचक्रोशीतील भक्तगण कथेचा आस्वाद घेत आहे याप्रसंगी बोलताना कथा आयोजक वारकरी संप्रदयातील बद्रीनाथ पाटील लिपाने म्हणाले की, वारकरी संप्रदाय हा भक्ती संस्कारांचा पाया आहे देव देवतांच्या भक्तीमुळे मनुष्य संस्कारमय होऊन जीवन सुखी होते असे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here