सोलापूर : उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या आणि निवडणुकीच्या टप्प्यावरील असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्यावे, असे शुद्धिपत्रक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने काढले आहे.
त्यामुळे राज्यातील सुमारे ८ हजार ३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सहकारी संस्थांच्या घोषित केलेल्या निवडणुका पावसाळ्यामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे परिपत्रक गुरुवारी (दि.२०) काढण्यात आले होते. त्यामुळे अनेक सहकारी संस्थांची निवडणूक सुरू असलेली हालचाल थांबल्या होत्या. मात्र, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शुक्रवारी (दि.२१) पुन्हा शुद्धिपत्रक जारी केले. त्यामुळे न्यायालय आणि निवडणुकीच्या टप्प्यावरील सहकारी संस्थेच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणुकीच्या टप्पा व न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू करण्याच्या प्रक्रिया सुरूच राहतील, असे शुद्धीपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या टप्प्यावरील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळापत्रकानुसार होणार आहेत.
सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; पावसामुळे सप्टेंबरनंतरच होणार प्रक्रिया