दौंड, ता. २२ पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या यवत या १२ व्या शाखेचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी चंद्रकांत आखाडे यांच्या हस्ते कार्यालयात सत्यनारायण पूजन करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील अनेक मान्यवरांनी संस्थेस कार्यालयास भेट देत शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. यवत शाखेचे कार्यालय प्रमुख सुनिल शितोळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी सहकारातील एक पुरंदर नागरी पतसंस्था एक खणखणीत नाणे आहे. अल्पावधीतच पुरंदर नागरी पतसंस्थेने पारदर्शक कारभाराने ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे. असे प्रतिपादन माजी आमदार रंजनाताई कुल यांनी केले. यावेळी वैशाली नागवडे, पुणे जिल्हा अध्यक्षा महिला राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) आप्पासाहेब पवार दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष ( शरद पवार गट ) समीर दोरगे सरपंच यवत, सुभाष यादव उपसरपंच यवत, गुलाब खुटवड, मधुकर दोरगे, नामदेव बारवकर, आनंद थोरात, राजकुमार मोटे, गणेश कदम, नितीन दोरगे, कुंडलिक खुटवड, बाळासाहेब लाटकर, रामभाऊ चौधरी, रामभाऊ टुले, दिलीप भोसले, नानासाहेब दोरगे, मच्छिंद्र दोरगे, एकनाथ यादव, अजित शितोळे, माऊली यादव, बाळासाहेब टेकवडे, प्रदीप पोमण, सुनिता कोलते, संभाजी काळाणे, चेतन महाजन, नितीन शितोळे, अनिल शितोळे, ज्ञानेश्वर शेळके, चांदगुडे साहेब, सुरेश काळखैरे, विठ्ठल दोरगे, प्रकाश दोरगे, पंडित दोरगे, व्ही.एस शितोळे, सुनिल दोरगे, रोहन दोरगे, विजयसिंह चव्हाण, सोमनाथ शितोळे, सोनू दोरगे, संदीप दोरगे, भाऊसाहेब दोरगे, दत्ता डाडर, विशाल टेकवडे, सूरज चोरगे, चंद्रकांत दोरगे, इत्यादी मान्यवर यवत येथील पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या शुभप्रसंगी सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळासोबत सर्व कर्मचारी वृंद, विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व हितचिंतक, सभासद व सेवक वृंद उपस्थित होते.