नांदेड प्रतिनिधी
भांडे,धान्य व कपडे, छत्री सह अठरा वस्तूंचा समावेश असलेल्या लायन्स सहायता किट वाटपाचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉ. डोईफोडे आणि लायन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया यांच्या हस्ते नलागुटाचाळ इथे करण्यात आला.
नांदेड येथे पूरग्रस्तांसाठी लायन्स इंटरनॅशनल च्या वतीने दहा हजार डॉलरची मदत करण्यात आली. धन्य भांडे कपडे छत्रीसह 18 वस्तूचा या किटमध्ये समावेश आहे या किटचे वाटप नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर डोईफोडे व लॉयन्स प्रांत पाल गिरीश सिसोदिया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपप्रांतपाल प्रथम आश्विन बाजेरिया, उपप्रांतपाल द्वितीय राहुल औसेकर, प्रांत सचिव रितेश छोरिया, रीजनल चेअर पर्सन तथा प्रोजेक्ट चेअरमन रवी कडगे, कॉर्डिनेटर ॲड. दिलीप ठाकूर हे उपस्थित होते. प्रास्ताविक करताना रवी कडगे यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात लायन्स परिवाराची भूमिका विशद केली. डॉ. डोईफोडे यांनी आपल्या भाषणातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या लायन्स परिवाराचे कौतुक केले. लायन्स प्रांतपाल सिसोदिया यांनी लायन्स तर्फे घेण्यात येणाऱ्या विविध सेवा प्रकल्पाची सविस्तर माहिती यावेळी दिली. अश्विन बाजेरिया व राहुल औसेकर यांची समायोचित भाषणे झाली. प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते २५ पूरग्रस्तांना लायन्स सहायता किटचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी लायन्स क्लब नांदेड च्या मिड टाऊन वतीने तयार करण्यात आलेल्या राम रक्षा किटचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी तर आभार झोन चेअरपर्सन गंगाबिषण कांकर यांनी मानले. कार्यक्रमाला पूर्व प्रांतपाल जयेश ठक्कर, दिलीप मोदी, नारायण कलंत्री, ॲड.प्रवीण अग्रवाल यांच्यासह नांदेड मेन लायन्स क्लब, नांदेड मिडटाऊन, नांदेड सेंट्रल, नांदेड प्राईड, नांदेड एंजल्स व लिओ क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते. त्यानंतर लायन्स प्रांतपाल सिसोदिया यांच्या हस्ते रयत रुग्णालयात रुग्णांना लायन्सचा डबा व रयत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कृपाछत्र उपक्रमांतर्गत छत्र्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झोन चेअर पर्सन शिवा शिंदे व पारुल जैन, सदाशिव महाजन, शिवाजी पाटील, मनीष माखन, मोहन देशमुख, नीलम कासलीवाल, ज्योती जांगिड, विजय होकर्णे, गौरव दंडवते, दीपेश छेडा, व्यंकटेश पंजाला, सत्यनारायण शिवरात्री यांनी परिश्रम घेतले.