पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथे राज्यातला पहिला सिट्रस इस्टेट मोसंबी प्रोजेक्टचे उद्घाटन संपन्न.

0
फोटो कप्शन: जायकवाडी : ईसारवाडी ता.पैठण येथे सिट्रस इस्टेटच्या कामाची माहिती पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांना देताना सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर पाटील.(छायाचित्र : गजानन आवारे)

पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील ईसारवाडी येथे महाराष्ट्रतला पहिला सिट्रस इस्टेट प्रोजेक्टचे भुमिपुजन सोहळा रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण,महानंदचे राज्य संचालक नंदलाल काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र तांबे, विठ्ठल दोरखे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णाभाऊ लबडे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख,सिट्रसचे मुख्य कार्यकारी रामनाथ कारले सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   याप्रसंगी बोलतांना मंत्री भुमरे म्हणाले की, सिट्रस इस्टेट ला जागा ही पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान येथे सन २०२२ मध्ये जागेस प्रशासकीय मंजूरी मिळाली होती ज्या वेळेस माती परिक्षण झाले त्या परिक्षणात आसे आढळून आले की, हि जागा सिट्रस ला योग्य नाही.नंतर पर्यायी जागा घेण्यासाठी थोडा वेळ लागला व ईसारवाडी येथील कृषी चिकित्सालय येथे जागा उपलब्ध झाल्याने येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी ३९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे.या ठिकाणी भव्य असे सिट्रस इस्टेट उभे राहणार आहे.यामध्ये माती परिक्षण केंद्र, प्रशिक्षण केंद्र, फुड स्टोरेज,शेडनेट, आदिंची निर्मिती या ठिकाणी करण्यात येणार आहे.महाराष्ट्रतला हा पहिला मोसंबीचा प्रोजेक्ट हा पैठण येथे उभारण्यात आला आहे येथे पाणी मुबलक असल्यामुळे पैठण तालुका या योजनेसाठी निवडण्यात आला आहे व केंद्राकडून आणखी १२ कोटी रुपये मिळणार असून एकूण ५२ कोटी रूपये या योजनेसाठी खर्च होणार आहे.या योजनेचा लाभ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यासह महाराष्ट्रातील सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल तसेच महाराष्ट्र राज्याचे

कृषी आयुक्त सुनील चव्हाण  यांनी बोलतांना सांगितले की, पैठण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र बोरकर यांनी ईसारवाडी येथे होणा-या सिट्रेस इस्टेटची कशा प्रकारे उभारणी होणार आहे याबाबत सखोल माहिती दिल्याबद्दल उप अभियंता बोरकर पाटील यांचे कौतुक केले पुढे बोलताना ते म्हणाले की  जवळपास बावीस हेक्टर जमीन ही या सिट्रस इस्टेटला देण्यात आली आहे.मंत्री भुमरे यांनी आणलेल्या सिट्रस इस्टेट च्या  माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊन यातून फळबागाला अधिक बळकटी मिळणार आहे.

     या कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजु भुमरे, रविंद्र शिसोदे, बद्रीनाथ बोंबले, अंकुश बोबडे, सरपंच योगेश सोनवणे,काॅट्रक्टर संजय भंडारी, शेखर पाटील शिंदे, राजेश मानधने,शहादेव लोहारे, अमोल जाधव, जगन्नाथ बोबडे, सोमनाथ शिरसागर, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी,  विजय गोरे, भाऊ लबडे,स्वियसहाय्यक नामदेव खराद, गणेश मडके,उपसरपंच सखाराम बोबडे, संचालक भिमराव डोंगरे, भगवान कापसे, अंकुश लघाणे,जगन्नाथ दुधे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेंद्र बोरकर,प्रा देविचंद मोरे, सरपंच धनंजय मोरे, विजय खडसन, गणेश बोबडे, महेश बोंबले,विक्रम बोबडे,लक्ष्मण बोबडे, कृष्णा पाटनकर, काकासाहेब बर्वे, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे, हरिभाऊ कातोरे,प्रकाश निकम, किशोर पाडळे, यशवंत चौधरी, जगदीश सोलाट, सचिन खराद, अशोक वाघचौरे, गणेश वाणी, संदीप जवने,रंजनी पवार,छाया अंभोरे,ज्ञानेश्वरी धनवे,भेलुबाई फोले,निलीमा मोरे सह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते  

———-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here